Eknath shinde-Tanaji sawant Latest News Sarkarnama
पुणे

कॅबिनेट मंत्रीपदानंतर तानाजी सावंतांना मुख्यमंत्री शिंदेंकडून आणखी एक बक्षीस!

Tanaji sawant : ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सावंतांना मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती.

राजेंद्रकृष्ण कापसे

पुणे : शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रीपदानंतर आणखी एक बक्षीस मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्यांच्याशी संबंधित असलेल्या शिक्षण संस्थेला 'जेएसपीएम' विद्यापीठ स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास आजच्या मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाली आहे. (Eknath shinde-Tanaji sawant Latest News)

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सावंत यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी कडून शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते त्रास होत असल्याचे वारंवार त्यांनी बोलून दाखवले होते. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार असताना नाराजी काढण्यासाठी त्यांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबतच्या गेलेल्या आमदारांमध्ये सावंत यांचाही समावेश होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सावंत यांचा प्रथम मंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य विभागाचे कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. आज त्यांच्या शिक्षण संस्थेला विद्यापीठाची मान्यता मिळाल्याने त्यांना पुन्हा एकदा बक्षीस मिळाले आहे.

दरम्यान, सावंत यांची पुणे, परिसरात जेएसपीएम नावाची मोठी शिक्षण संस्था आहे. शाळा आणि टेक्निकल शिक्षण देणारी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय आहेत. 'जेएसपीएम विद्यापीठ पुणे' या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे विद्यापीठ २०२३-२४ पासून सुरु होईल. तसेच याबाबतीत विधिमंडळासमोर विधेयक सादर करण्यात येईल. हे प्रस्तावित विद्यापीठ हवेली तालुक्यातील वाघोली येथे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT