Pimpri-Chinchwad News Sarkarnama
पुणे

PCMC Crime News : मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी पकडला; पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारांचा कट उधळला

Police News : शहरात होणाऱ्या मोठ्या गंभीर गुन्ह्यांना पायबंद बसल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी केला.

उत्तम कुटे

Pimpri-Chinchwad News : मध्य प्रदेशातून (एमपी) महाराष्ट्रात आणि त्यातही उद्योगनगरीत शस्त्रात्रांच्या आणखी एका मोठ्या तस्करीचे रॅकेट पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या प्रकरणी चौघांची धरपकड करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाच पिस्तुले आणि दहा काडतुसे असा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. यामुळे शहरात होणाऱ्या मोठ्या गंभीर गुन्ह्यांना पायबंद बसल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी केला.

तीन महिन्यांपूर्वी शहर पोलिसांच्या (Police) दरोडा विरोधी पथकाने तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील दोन सराईत गुंड आणि त्यांच्या पाच साथीदारांना सापळा लावून पकडले, तेव्हा त्यांच्याकडे ११ पिस्तुले आणि ३५ काडतुसे मिळाली होती. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांचा यावर्षी १२ मे रोजी भरदिवसा नगरपरिषद कार्यालय आवारातच निर्घृण खून झाला होता.

त्याचा बदला घेण्यासाठी या टोळीने हा शस्त्रसाठा एमपीतून आणला होता. ते मावळातील एका बड्या राजकीय नेत्याचा गेम करणार होते. त्यामुळे त्यांना पकडल्यानंतर एक मोठा कट उधळून लावल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला होता. या टोळीला नंतर 'मोक्का' लावण्यात आला. गेल्या वर्षाच्या सुरुवातीसच दरोडा विरोधी पथकानेच एमपीतून आलेली १४ पिस्तुले आणि आठ काडतुसे जप्त करीत चौघांना बेड्या ठोकल्या होत्या.

आता खंडणीविरोधी पथकाने हा शस्त्रसाठा पकडला. तोही एमपीतूनच आला होता. त्यातून एमपीचे शस्त्र तस्करीचे कनेक्शन पुन्हा समोर आले. एवढा मोठा शस्त्रसाठा नेमका कशासाठी आणला होता, हे आरोपींच्या चौकशीतून समोर येईल; पण यामुळे अनेक गंभीर गुन्हे टळल्याचा दावा खंडणीविरोधी पथकाचे सीनिअर पीआय अरविंद पवार यांनी केला. या प्रकरणी अस्लम अहमद शेख (रा. थेरगाव), सचिन उत्तम महाजन (रा. सुरवड, ता. इंदापूर, जि. पुणे), संतोष विनायक नातू (रा. स्वारगेट, पुणे) आणि राहुल ऊर्फ खंडू गणपत ढवळे (रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे) या चौकडीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

जप्त शस्त्रसाठा हा अडीच लाख रुपये किमतीचा आहे. नातू व ढवळे हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध खून, दरोडा, अपहरण, लूटमार आदी गंभीर गुन्हे पुणे शहर, पुणे (Pune) ग्रामीण आणि सोलापूरला (Solapur) दाखल आहेत. नातूला पुणे शहर पोलिसांनी तडीपार केले असून, महाजन याला पुणे ग्रामीण पोलिसांनी 'मोक्का' लावलेला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT