Chagan Bhujbal Threatening : Sarkarnama
पुणे

Chagan Bhujbal Threatening : भुजबळांना धमकी देणाऱ्याची अटक बेकायदेशीर; न्यायालयाकडून मुक्त करण्याचे आदेश

सरकारनामा ब्यूरो

Chhagan Bhujbal threaten News: शिंदे फडणवीस सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.या प्रकरणी पोलिसांनी ११ जुलै रोजी एका संशयित आरोपीला अटकही केली. पण आता ही अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत आरोपीची लोक अभिरक्षक कार्यालयाने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने त्याची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.

अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणारे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी एका तरुणाला अटकही करण्यात आली होती. पण या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक करताना पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही, असे निरीक्षण नोंदवत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंद्रशीला पाटील यांनी आरोपीला मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली आहे.प्रशांत पाटील (वय २४) असे संबंधित संशयित आरोपीचे नाव आहे.

मला भुजबळ यांना मारण्याची सुपारी मिळाली आहे. उद्या मी त्यांना मारणार, असा फोन करत एका अनोळखी व्यक्तीने भुजबळ यांना मारण्याची धमकी दिली होती. भुजबळ यांच्या पुणे येथील कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवत संशयित तरुणाला अटकही केली. पण ही अटक बेकायदा असल्याचे लोक अभिरक्षक कार्यालयाने निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आरोपीला जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भुजबळ यांच्यासमवेत राहणारे संतोष गायकवाड यांच्या मोबाइल फोनवर ही धमकी देण्यात आली होती. आपल्याला सुपारी मिळाल्याचे सांगत आपण सांगून काम करतो, असे समोरून व्यक्ती सांगत होती. त्यावर, कशासाठी सुपारी दिली, भुजबळांनी तुमचं काय बिघडवलं असं विचारल्यावर समोरच्या व्यक्तीने ते काय माहिती नसल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT