Pune News: संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात दाखल झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) येथे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिरात (नाना पेठ) येथे असणार आहे.
या दोन्ही मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून आज सायंकाळी मंदिरांमध्ये पालखीचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर अभिषेक आणि पादुकापूजन आणि आरतीने या दोन्ही पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
दोन्ही मंदिरांमध्ये उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. पालखी येण्याआधीच प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून वारकऱ्यांच्या व्यवस्थेसह सुरक्षेपर्यंत सर्व काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. त्याबरोबरच पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात आलेले आहेत.
दरम्यान, या बरोबरच पालखी जाणाऱ्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असल्याने त्यासाठी पुणेकरही सज्ज आहेत.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.