Sharad Pawar, Arvind Kejriwal Sarkarnama
पुणे

Arvind Kejriwal ED : शरद पवारांचा अंदाज खरा ठरणार; केजरीवालांना अटकेची शक्यता, काय आहे कारण?

उत्तम कुटे

Maharashtra Political News : आम आदमी पार्टी तथा 'आप'चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, असा अंदाज ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) मंचरच्या (जि. पुणे) सभेत व्यक्त केला होता. आता तो संशय खरा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी लोकसभेसाठी इंडिया आघाडीसोबत जायचे 'आप'ने ठरवल्यानंतर जागावाटपही फायनल अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे भाजपचा तिळपापड झाला आहे.

आता इंडिया आघाडीसोबत जाऊ नये, यासाठी 'आप'वर दबाव वाढला आहे, अन्यथा केजरीवाल (Arvind Kejariwal) यांना अटक करण्याची वॉर्निंग दिली आहे. त्यासाठी त्यांना एक-दोन दिवसांत सीबीआय सीआरपीसीच्या कलम 41 A अंतर्गत नोटीस देण्याची शक्यता आहे. तसेच इंडिया आघाडी सोडली, तर सीबीआय नोटीस पाठवणार नाही किंवा अरविंद केजरीवालांना अटक करणार नाही, असे सांगण्यात आल्याचा दावा 'आप'च्या (AAP) महाराष्ट्राच्या पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी टाकलेले पाऊल मागे घेण्याबाबत कालपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना निरोप मिळत आहेत, असेही बेंद्रे यांनी सांगितले आहे. मात्र, आमचा पक्ष हा मोदी किंवा त्यांच्या कोणत्याही एजन्सीला घाबरणारा नाही. तो जनतेसाठी लढत राहील, त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी आहे, असा विश्वास व्यक्त करत 'आप' इंडिया आघाडीचा भाग राहील, असेही बेंद्रे यांनी स्पष्ट केले.

लोकसभेला दिल्ली, गुजरात, हरियाणा, गोवा येथील इंडिया आघाडीतील आप आणि काँग्रेसमधील जागावाटप पूर्ण झाले आहे. पंजाबामध्ये मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्र लढतील, तर महाराष्ट्रात 'आप' हा एकही जागा लढविणार नसला, तरी इंडिया आघाडीला (INDIA Alliance) पाठिंबा देणार आहे. गोव्यातील दोन्ही जागा, तर दिल्लीतील सातपैकी तीन जागा काँग्रेस आणि चार जागा आप लढणार आहे. हरियाणात काँग्रेसला नऊ, तर आपला एक, गुजरातमध्ये काँग्रेस चार, तर आपला एक जागा सुटल्या आहेत. या जागावाटपाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT