Pune Crime
Pune Crime Sarkarnama
पुणे

मित्रांनीच केला घात : पुण्यात संगणक अभियंत्याच्या डोक्‍यात गोळी घालून खून

पांडुरंग सरोदे : सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील उच्चभ्रु सोसायटीत संगणक अभियंत्याच्या खुनाच्या घटनेचा कोंढवा पोलिसांनी उलगडा केला आहे. घरात पार्टी सुरू असतानाच मित्रांनी संगणक अभियंत्याच्या डोक्‍यात पिस्तुलातून गोळी घालून त्याचा खून केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. खुनाचे कारण अद्याप पुढे आले नाही. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

गणेश यशवंत तारळेकर (वय 47, रा. कोंढवा बुद्रुक) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. सागर दिलीप बिनावत (वय 33), दत्तात्रय देवीदास हजारे (वय 47, दोघेही रा. कोंढवा बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्फुर्ती तारळेकर (रा. पिसोळी ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तारळेकर हे कोंढवा बुद्रुक येथील एका उच्चभ्रु सोसायटीत राहात होते. पती गणेश यांच्यासमवेत असलेल्या कौटुंबिक वादामुळे फिर्यादी पत्नी व त्यांचा 14 वर्षांचा मुलगा मागील दिड वर्षापासून जवळच असलेल्या त्यांच्या माहेरी राहात आहेत. त्यामुळे तारळेकर हे एकटेच त्यांच्या घरात राहात होते.

गणेश यांनी सोमवारी दिवसभर त्यांची सदनिका उघडली नाही, अशी माहिती कोंढवा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तेव्हा, गणेश हे त्यांच्या सदनिकेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तसेच त्यांच्या डोक्‍याला पिस्तुलाची गोळी लागून त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यानंतर गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनेच्या दोन दिवस आगोदर तारळेकर यांनी सासऱ्यांना फोन करून आपण आत्महत्या करणार आहोत, अशी धमकी दिली होती. त्यामुळे ही घटना आत्महत्या असल्याचा पोलिसांना संशय होता.

गणेशने सोमवारी दुपारी त्याच्या दोन मित्रांना घरी बोलावून मद्यपानाची पार्टी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या कारणावरुन दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा, तारळेकर याने त्याच्याकडील पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यास वाचविताना गोळी सुटून तारळेकर यांचा मृत्यु झाल्याचे दोन संशयित आरोपी सांगत आहेत. मात्र, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आरोपींनी पिस्तूल लपविले

तारळेकरने दोन दिवसांपुर्वी सासऱ्यास फोन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यावरुन हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांना वाटले. मात्र चौकशीमध्ये दोघांनी खुन केल्याची माहिती दिली. पिस्तुलातुन गोळी सुटल्याने तारळेकरचा मृत्यु झाला, असे आरोपींचे म्हणणे आहे. मग आरोपींनी पिस्तुल नष्ट का केले, पोलिस किंवा त्यांच्या नातेवाईकांपासून ही घटना का लपविली ? पिस्तुल नेमके कोणाचे आहे आणि तारळेकर यांचा खुन करण्याचे नेमके कारण काय आहे, याचा पोलिस तपास करीत आहेत.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT