Ramdas athawale devendra Fadnavis sarkarnama
पुणे

Maharashtra Politics : '...तर आम्ही प्रचारात सक्रिय होणार नाही', आठवलेंच्या पक्षाने वाढवले भाजपचे टेन्शन

Assembly election Ramdas athawale BJP RPI : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून यामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत त्यामुळे तिथे आम्हाला संधी मिळायला हवी, अशी मागणी परशुराम वाडेकर यांनी केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महायुतीमध्ये जागा वाटपाचे खलबत्ते सुरू आहेत. महायुतीमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने 10 ते 12 जागांवर आपला दावा सांगितला आहे. त्यामध्ये पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ 'रिपाइं'साठी सोडावा अन्यथा निवडणूक प्रचारामध्ये आम्ही सक्रिय होणार नाही, असा इशारा रिपाइंचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी दिला आहे.

परशुराम वाडेकर म्हणाले, आज केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची मजबूत पकड आहे. आपल्याला सत्ता मिळवायची असेल तर काहीतरी तडजोड करणे आवश्यक आहे, या विचारातून आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेच्या विरोधी असलेल्या राजकीय पक्षांशी युती करण्याचे धैर्य रामदास आठवलेसाहेबांनी दाखवले. साहेबांच्या या निर्णयाचा फायदा चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांना कमी आणि भाजपला अधिक होत असल्याचे या 15 वर्षातील चित्र आहे. यामुळे आंबेडकरी समाजात नाराजीचे वातावरण आहे.

आमच्या पक्षाला लोकसभेला संधी नाही मिळाली आता विधानसभा निवडणूकीत किमान 12 जागा मिळाव्यात, ही पक्षाची भाजपकडे मागणी आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून यामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत त्यामुळे तिथे आम्हाला संधी मिळायला हवी. भाजपने आम्हाला संधी द्यावी या वेळेस कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी वातावरण चांगले आहे, असे देखील वाडेकर म्हणाले.

रिपाइंला जागा दिल्यास भाजपचा फायदा

भाजपने आंबेडकरी चळवळीतून आलेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर आंबेडकरी समाजात महायुतीब‌द्दल एक सकारात्मक संदेश जाईल. यामुळे महायुतीला पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्‌या प्रमाणावर फायदा होईल, असेही वाडेकर यांनी नमूद केले.

गेली 15 वर्षामध्ये भाजपाने महायुतीमधून एकही जागा रिपाइंला दिली नाही त्यामुळे आधीच मोठी नाराज आहे. या वेळेस संधी न मिळाल्यास त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्हाला सन्मानपूर्वक जागा देऊन आंबेडकरी समाजाची नाराजी दूर करावी, असे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT