Laxman Hake on Manoj Jarange Sarkarnama
पुणे

Laxman Hake Video : मनोज जरांगेंनी मतदारसंघ जाहीर करताच लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले, '***** आले'

Laxman Hake Criticized Manoj Jarange : ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना आपलं समर्थन दिलं, पैसा दिला, माणसं दिली आणि लेखी पत्र दिली त्या त्या सर्व नेत्यांना आम्ही जाब विचारणार आहोत, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

Sudesh Mitkar

Pune News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (रविवारी) इच्छुक उमेदवारांची अंतरवली सराटी येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर मराठवाड्यातील काही जागांवर उमेदवार देण्याचा त्यांनी निश्चित केला असून आज सायंकाळपर्यंत ते उमेदवारी यादी जाहीर करणार आहेत. जरांगे यांच्या या भूमिकेनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया देताना त्यांची जीभ घसरली.

हाके म्हणाले, मनोज जरांगे हे औकातीवर आले आहेत. 130 मतदारसंघामध्ये पाडू,लोळवू, सुपडा साफ करू अशी त्यांची भाषा होती.मात्र, आमदार पाडण्याची भाषा करणारे जरांगे यांना एका हाताच्या बोटावर मोजण्या इतके उमेदवार देता आले नाहीत.

बारामती येथून शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना दम दिला असल्यामुळे त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यामुळे जरांगे हे एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत देखील उमेदवार देतील असं मला वाटत नाही, असा टोला देखील हाके यांनी जरांगेंना लगावला.

ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना आपलं समर्थन दिलं, पैसा दिला, माणसं दिली आणि लेखी पत्र दिली त्या त्या सर्व नेत्यांना आम्ही जाब विचारणार आहोत. आणि ज्या पक्षांना आणि उमेदवारांना याबाबत उत्तर देता येणार नाही. त्यांनी त्यांना ओबीसींनी मतदान करू नये, असे आवाहन आम्ही करणार असल्याचं हाके यांनी सांगितले.

शिलालेखावर लिहून घ्या

जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की जे नेतेमंडळी संविधानाची शपथ घेऊन देखील आपल्या मतावर ठाम राहत नाहीत. त्यांच्याकडून स्टॅम्प पेपरवरती लिहून काही होणार नाही. तुम्ही ताम्रपट अथवा शिलालेखावर राजकारण्यांकडून लिहून घ्यावे. कारण ते कोणत्याही मतावर ठाम नसतात, अशी खिल्ली हाके यांनी जरांगेंच्या स्टॅपपेपर लिहून घेण्याच्या वक्तव्याची उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT