Amit Thakray and Nihar Thakray Sarkarnama
पुणे

Utsavnama : 'सरकारनामा'च्या 'उत्सवनामा'त ठाकरेंच्या दोन नातवांची छाप

Mayur Ratnaparkhe

Pune News : दिवाळीचे औचित्य साधून 'सकाळ ' माध्यम समूहाच्या 'सरकारनामा' या वेब पोर्टलने आयोजित केलेल्या 'उत्सवनामा'ने बुधवारचा दिवस गाजवला. घरच्या सरकारांच्या मनातील साडी निवडताना त्यांच्या अहोंची चांगलीच मजा आली. साडी खरेदीसाठी पुण्यातील राजकीय वर्तुळातील नेते मंडळी तर आलेच, परंतु ठाकरेंच्या दोन नातवांच्या आगमनाने उत्सवनामाचा एक वेगळाच माहोल बनला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाणेरमधील सकाळनगरातील सरकारनामाच्या कार्यालयाच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन निहार ठाकरे आणि अंकिता पाटील-ठाकरे यांच्या हस्ते झाले, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावल्याने कार्यक्रमात चांगलीच शोभा आली.

दिवाळीनिमित्त साडी खरेदीसाठी शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत, विविध दुकाने पालथी घालताना महिलांचा जीव मेटाकुटीस येतो, तर पुरुष मंडळींनाही गृहलक्ष्मीचं मन राखण्यासाठी निमूटपणे सोबत जावे लागते. अशावेळी सरकारनामाने उत्सवनामा या कार्यक्रमांतर्गत पुणेकरांच्या सोयीसाठी एकाच ठिकाणी दर्जेदार आणि आकर्षक अशा साड्या उपलब्ध करून दिल्या.

यासाठी चार स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. या स्टॉलमध्ये शालू, पैठणी, बनारसी, नारायणपेठी, कांजीवरम, पेशवाई, कॉटन सिल्क, डोला सिल्क, पटोला, गढवाल, जॉर्जेट, शिफॉन आदी एकापेक्षा एक सुंदर साड्या उपलब्ध होत्या. त्यामुळे हवी तशी साडी खरेदी करण्यासाठी महिला वर्गाने चांगलीच गर्दी केली होती.

कार्यक्रमास कोणी लावली हजेरी? -

आमदार माधुरी मिसाळ, हेमंत रासने, रूपाली ठोंबरे - पाटील, सायली वांजळे, उज्ज्वल केसकर, सुलभा उबाळे, माजी उपमहापौर कमलताई व्यवहारे, सविता पाटील, प्रज्ञा खानविलकर, सविता पाटील, प्रमोद साठे, जयश्री आबा बागूल, शाम मगर, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, शांतीलाल सूरतवाला, सुनीता कदम, अरविंद शिंदे, अजित दरेकर, किशोर शिंदे, वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत, दीप्ती चवधरी, परशुराम वाडेकर, प्रसिद्धी पाटील, संजय हरपळे, वैजयंती पुराणकर, वैष्णवी चौधरी, संगीता निंबाळकर, नाना काटे, प्रांजली वाकचौरे, माजी आमदार कमलताई ढोले पाटील, बाबू वागसकर, वनिता वागसकर, दत्तात्रेय धनकवडे, स्वप्नील जगताप, संगीता तिवारी, शर्मिली सरदेसाई, जयकुमार दादलानी, तनवीर पाटील आदींनी 'उत्सवनामा'ला हजेरी लावली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT