Avinash Bagave
Avinash Bagave  
पुणे

अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द

सरकारनामा ब्युरो

पुणे : अनधिकृत बांधकाम प्रकरणी काँग्रेसचे (Congress) नगरसेवक अविनाश बागवे (Avinash Bagave) यांचे नगरसेवकपद (Corporator) उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याने त्यांच्याविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. भुपेंद्र शेडगे यांनी लघुवाद न्यायालयात खटला दाखल केला होता.

बागवे यांनी बेकायदा बांधकामाची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे न्यायालयाने बागवे यांचे नगरसेवक पद रद्द केले. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी न्यायालयाने बागवे यांना सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. ‘‘उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आम्ही आदर करतो. या आदेशावर ६ आठवड्यांची स्थगिती असून, या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,''असे अविनाश बागवे यांनी म्हटले आहे.

बागवे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयातही लघुवाद न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत बागवे यांचे नगरसेवक पद रद्द ठरवण्यात आले. आता बागवे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी दिली आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत लोहियानगर भागातून बागवे निवडून आले. मात्र निवडणूकीवेळी बागवे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा दावा करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मात्र, निवडणूक आयोगाला शेडगेंची हरकत त्या वेळी फेटाळली. त्या निर्णयाविरोधात शेडगेंनी लघुवाद न्यायालयात दाद मागितली आणि बागवे यांनी बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी पुरावेही सादर केले होते.न्यायालयातही बेकायदेशीर बांघकाम सिद्ध झाल्याने 'महाराष्ट्र महापालिका अधिनयमानुसार बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT