Pravin Lonkar  Sarkarnama
पुणे

Baba Siddique Dead Updates: बाबा सिद्दीकी खून प्रकरणात पुण्यातून एक जण ताब्यात; मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

Sudesh Mitkar

Pune News : माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी पुण्यातील वारजे भागातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी ही कारवाई केली.या प्रकरणी पोलिसांनी शुभम लोणकरचा 28 वर्षीय भाऊ प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक केली. पुणे शहर पोलिस दलातील एका अधिकाऱ्याने त्याला दुजोरा दिला आहे.

शुभम लोणकरसह धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे कटात सहभागी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईत शनिवारी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. पसार झालेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. रविवारी वारजे परिसरातून प्रवीण लोणकर या संशयिताला ताब्यात घेतले. त्याचा डेअरीचा व्यवसाय असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी काही आरोपी पुण्यातील वारजे भागात वास्तव्यास होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली.

कोण आहे शुभम लोणकर

शुभम लोणकर हा अकोला येथील अकोट राहणार आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याला पोलिसांनी पुण्यातून शस्त्रास्त्र तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याच्याकडून तीन पिस्तूल आणि 14 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावरती सुटला होता. शुभम याचे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचे उघड झालं आहेत. लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभमचे नेटवर्क दुबईसह इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहे. शुभम 2014 पासून गावातून फरार आहे.

ती पोस्ट प्रसारित करणारा प्रवीण

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली होती. ती 'शुभु लोणकर महाराष्ट्र' या फेसबुक आयडीवरून करण्यात आली होती. ही पोस्ट समाज माध्यमावर शुभम लोणकरचा सख्खा भाऊ प्रवीण याने केली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ही अटक करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT