bacchu kadu sarkarnama
पुणे

Bacchu Kadu : ''महाराष्ट्रात मोठा धमाका होणार; महायुती अन् महाविकास आघाडीही फुटणार'' ; बच्चू कडूंचं पुण्यात भाकीत!

Bacchu Kadu on Mahavikas Aaghadi and Mahayuti News '... त्यामुळे आमची तिसरी आघाडी म्हणणारे ते तिसऱ्या क्रमांकावर जाणार असून आमची आघाडी पहिल्या क्रमांकावर येणार आहे.' असा दावा देखील बच्चू कडू यांनी केली आहे.

Mayur Ratnaparkhe

Vidhan sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये सारं काही अलबेल नसल्याचं सध्या चित्र पाहायला मिळत आहे. जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते आमने-सामने आल्याची पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी चे 210 जागांवर एकमत झालं असून उर्वरीत काही जागांवर एकमत होणं अद्याप बाकी असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट एकला चलो ची भूमिका देखील घेऊ शकतो, असे देखील बोलले जात आहे.

महायुती मधील मित्र पक्षांचा विचार केल्यास भाजपकडून(BJP) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये शिवसेना शिंदे गटाने दावा केलेल्या जागांवर देखील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अपेक्षित जागा मिळत नसल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे महायुती व आघाडी टिकणार का? असं प्रश्न सामान्य लोकांना पडत आहे.

या पार्श्वभूमीवर परिवर्तन महाशक्तीचे नेते बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी महाविकास आघाडीतील एक पक्ष लवकरच बाहेर पडेल तर महायुतीमधील देखील एक नाराज मित्र महायुतीची साथ सोडेल असं जाहीर वक्तव्य केलं आहे. आपल्याला सूत्रांनी माहिती दिली असल्याचा देखील बच्चू कडूंनी पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे.

परिवर्तन महाशक्तीची आज(रविवार) पुण्यामध्ये पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये परिवर्तन महाशक्तीकडून दहा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू-अचलपूर, अनिल छबिलदास चौधर- रावेर यावल,गणेश रमेश निंबाळकर - चांदवड,सुभाष साबणे- देगलूर बिलोली,अंकुश सखाराम कदम - ऐरोली,माधव दादाराव देवसरकर हद‌गाव हिमायतनगर,गोविंदराव सयाजीराव भवर- हिंगोली, वामनराव चटप ७० - राजुरा, तसेच शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्यात. पण त्यावर कोण उमेदवार असले हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

परिवर्तन महाशक्ती पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बच्चू कडू म्हणाले, परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पहिली 10 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि इतर नावाने देखील लवकर जाहीर करू. दीडशे जागांवर आमचं एकमत झाला असून त्या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून लढवण्यात येणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याची शक्यता आहे. आघाडीतील एक पक्ष फुटून बाहेर निघणार आहे.

तर महायुतीतील एक मित्र बाहेर येण्याचीही दाट शक्यता असल्याचे सूत्र आमच्यापर्यंत पोहोचली आहेत. ओढून ताणून जरी ही आघाडी राहिली तरी आघाडीतील उमेदवारांनाच पाडण्याचं काम त्यांचे मित्र पक्ष करतील अशी मोठी चर्चा सुरू आहे. त्याबाबतचे अनेक फोन आमच्याकडे आले आहेत. इकडे महायुती झाली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये महायुतीबाबत चांगला संदेश गेलेला नाही. त्यामुळे आगामी चार तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन पाहायला मिळेल. महाराष्ट्रात फार मोठा धमाका होईल. त्यामुळे आमची तिसरी आघाडी म्हणणारे ते तिसऱ्या क्रमांकावर जाणार असून आमची आघाडी पहिल्या क्रमांकावर येणार आहे. असं बच्चू कडू म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT