Rahul Bajaj sarkarnama
पुणे

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

बजाज उद्योगसमूहाला नव्या उंचीवर नेण्यात राहुल यांचा मोठा वाटा होता...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ज्येष्ठ उद्योगपती, बजाज उद्योगसमूहाचे अध्यक्ष राहुल बजाज (वय 83) यांचे आज पुण्यात निधन झाले. ते गेले काही दिवस कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या मागे बजाज अॅटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज आणि बजाज फिन सर्व्हिसेसचे संजीव बजाज अशी दोन मुले आहेत. त्यांची मुलगी सुनयना हिचा विवाह मनीष केजरीवाल यांच्याशी झाला आहे.

देशातील नामांकित उद्योगसमूह म्हणून बजाज समूहाला उंचीवर नेण्यात राहुल यांचा मोठा वाटा होता. 10 जानेवारी 1938 रोजी त्यांचा कोलकता येथे जन्म झाला होता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती जमनालाल बजाज यांचे ते नातू होत. बजाज अॅटो, बजाज फिन सर्व्हिसेस, बजाज फायनान्स अशा नामांकित कंपन्या या समूहाकडे आहेत. राहुल हे 2006-10 या कालावधीत राज्यसभेवर खासदार होते.

दूरदर्शी, स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. देशात दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्यांत त्यांचा समावेश होता. `हमारा बजाज` म्हणून त्यांनी तयार केलेली टॅगलाईन ही लहानथोरांच्या ओठावर होती. पुण्यावर त्यांचे प्रेम होते. पुण्यातील अनेक संस्थांना, रुग्णालयांना त्यांनी मदत केली होती. औरंगाबाद एमआयडीसी विकसित होण्यात त्यांचा वाटा होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT