रोहिदास घाडगे
राजगुरुनगर (पुणे) : पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या (Rajgurunagar Co-operative Bank) नुतन इमारतीच्या उद्घाटना कार्यक्रमात, व्यासपीठावर आणि समोरील नागरिकांच्या तोंडाला मास्क नसल्याने भर कार्यक्रमात आयोजकांची सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी कानउघाडणी केली.
''कोरोना महामारीच्या संकटाचा सामना प्रत्येकाने अनुभवला आहे, या महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पहिल्या लाटेचा सामना करत असताना दुस-या लाटेच्या संकटात संसर्ग होत असताना तिसऱ्या लाटेचं संकट आहे. असं असतानांही आपल्या कोरोनाचे गांभीर्य राहिलेच नाही,'' अशा शब्दात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्षांसह संचालक मंडळ आणि बँक व्यवस्थापनांना सुनावले.
खेड तालुक्यातील कडुस येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी सहकारमंत्री थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, उपाध्यक्ष अरुण थिगळे,आणि संचालक मंडळासह खेडचे आमदार दिलीप मोहिते उपस्थित होते. यावेळी कुणीही मास्क लावले नसल्याने भरसभेत पाटलांनी नाराजी व्यक्त केली
''देशावर कोरोना महामारीचे संकट आले असताना आपल्या आर्थिक राजधानीच्या शहरांवर या संकटाचा प्रभाव वाढला होता, त्यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी काळजी घेण्याची गरज आहे,'' असे बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.
शेतक-यांच्या परवानगीशिवाय वीजबीलाची थकबाकी साखर कारखाने वसुल करणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात वीजबिल थकबाकीमुळे महावितरण कंपनी संकटात असताना शेतक-यांच्या वीजबिलाच्या थकबाकीसाठी साखर कारखान्यांच्या ऊस बिलातुन वसुली करण्याच्या सुचना साखर आयुक्तांनी केल्यात असं असताना "शेतक-यांच्या परवानगीशिवाय वीजबीलाची थकबाकी साखर कारखाने वसुल करणार नसल्याचे सहकारमंत्री पाटलांनी यावेळी स्पष्ट केल.
''पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये वीजबिलांची थकबाकीही मोठ्या प्रमाणात असल्याने मागील वर्षी थकीत वीज बिलाबाबत साखर आयुक्तांनी साखर कारखाना व्यवस्थापनाशी बैठक घेऊन महावितरणच्या थकीत वीजबील वसुली बाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. याच प्रस्तावावरच या वर्षी पुन्हा सक्तीने वीजबील वसुलीसाठी साखर कारखान्यांना सांगण्यात आले आहे. मात्र, हि वसुली करत असताना संबंधित शेतक-याची परवानगी असल्यास हि वसुली करता येईल,'' असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.