Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray Sarkarnama
पुणे

`बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला ठेच लागली असेल!`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्रात हनुमान चालिसा, जय श्रीराम म्हणाले तर अटक होत आहे. अशाप्रकारची स्थिती पाहून स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही आत्म्याला ठेच पोहचली असेल, अशा शब्दात केंद्रीय अन्न व पुरवठा, पर्यावरण, हवामानबदल खात्याचे राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी हल्ला चढविला.

उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जात आहेत, त्याचे स्वागत केले पाहिजे. सकाळी किंवा रात्री भोंग्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारचे जे नियम आहेत, त्याचे पालन झाले पाहिजे. बिहार मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव इफ्तार पार्टीत एकमेकांना गळ्याला पडले असतील तर त्यात गैर नाही. वेगवेगळ्या धर्माच्या सणात एकमेकांनी उत्साहाने भेटण्यास योग्यच आहे. पण त्यातून बिहार मध्ये कोणतीही राजकीय उलथापालथ होणार नाही, तेथे ‘एनडीए’चे सरकार सत्तेत राहील.

महाराष्ट्रात २० टक्के जमीन ही वन अच्छादित जमीन आहे, गेल्या तीन वर्षात वन्यप्राणी व माणसांवर हल्ले झाले आहेत, त्यामुळे जंगलामध्ये अशा घटना टाळण्यासाठी लक्ष दिले जात आहे. पश्चिम घाटातील वन वैभव टिकविण्यासोबत प्रयत्न आहेत, असे चौबे यांनी सांगितले.

चौबे म्हणाले, ‘‘ मोदी सरकार महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तेल, डाळ यासह इतर अन्नधान्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे, पण हे युद्ध लांबल्यास महागाई आणखी वाढू नये, यासाठी दीर्घकालीन धोरण ही ठरविण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूवरील किमती वाढू नयेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ‘वन नेशन, वन रेशन योजनेनुसार देशातील ३० लाख स्थलांतरित नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे.’’

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT