Sanjay Balgude Sarkarnama
पुणे

कॉंग्रेस प्रदेश कार्यकारिणीत पुण्यातून बालगुडे यांना बढती; शिंदेंचाही समावेश

कॉंग्रेसने नव्याने जाहीर केलेल्या विस्तारीत कार्यकारिणीत चार उपाध्यक्ष, १६ सरचिटणीस, १७ चिटणीस, दोन कार्यकारिणी सदस्य व एक प्रवक्ता यांचा समावेश करण्यात आला आहे.

umesh ghongade

सरकारनामा ब्यूरो

पुणे : प्रदेश कॉंग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत पुण्यातून संजय बालगुडे यांना सचिव पदावरून सरचिटणीस पदावर बढती देण्यात आली आहे तर नगरसेवक अरविंद शिंदे यांनाही सरचिटणीस करण्यात आले आहे.

कॉंग्रेसने नव्याने जाहीर केलेल्या विस्तारीत कार्यकारिणीत चार उपाध्यक्ष, १६ सरचिटणीस, १७ चिटणीस, दोन कार्यकारिणी सदस्य व एक प्रवक्ता यांचा समावेश करण्यात आला आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्यात नवी कार्यकारिणी बनविण्यात आली. यात काहीजणांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावर नाराजी व्यक्त करीत पटोले यांनी दिल्लीत पक्षाचे नेते राहूल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर नव्या विस्तारीत कार्यकारिणीत पटोले यांनी दिलेल्या काही नावांचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात रमेश बागवे यांची पुण्याचे शहराध्यक्ष म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात आली.बागवे यांच्या जागी बालगुडे व शिंदे यांच्या नावाची चर्चा होती.मात्र, आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन शहराध्यक्षपदावर बागवे यांना कायम ठेवण्यात आले.पुण्यात कॉंग्रेसचा परंपरागत मतदार मोठ्याप्रमाणात आहे.या निवडणुकीत कॉंग्रेस नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या सूचना पक्षाच्यावतीने सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

शहरात कॉंग्रेसचा परंपरागत मतदार मोठा असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. राष्ट्रवादीकडे अजित पवार यांच्यासारखे नेतृत्व आहे तर भारतीय जनता पार्टी महापालिकेत मोठ्या बहुमताने सत्तेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कॉंग्रेसला एकदिलाने लढून असलेले अस्तित्व टिकविण्याबरोबरच ताकद वाढविण्याचे आव्हान आहे. शहरात राष्ट्रवादी आणि भाजपाकडे नेतृत्व आहे. कॉंग्रेसकडे एकमुख नेतृत्वाची वानवा आहे. त्यामुळेच कॉंग्रेसचे गेल्या दहा वर्षात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

Edited By Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT