पुणे : बंडातात्या यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच स्थानिक आमदार व इतर नेत्यांबाबतही बेताल वक्तव्ये केली आहेत. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हभप या पदवीला मलीन करण्याचा प्रयत्न बंडातात्या कराडकर यांनी केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केली आहे.
बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उटमले असून यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी संताप व्यक्त केला आहे. कराडकर यांच्या अशा विधानामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला आणि प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा आरोप चाकणकर यांनी केला.
हभप बंडातात्या कराडकरांच्या विरोधात राज्यभरातून महिला आयोगाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून काल सातारा पोलिसांना कराडकर यांच्यावर कठोर कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल ४८ तासात महिला आयोगाला सादर करावा असे निर्देशित केले होते. त्यानुसार आज सकाळपासून कारवाई सुरू झाली, असल्याचे रूपालीताई म्हणाल्या.
वारकरी संप्रदाय बोधनाचे कार्य करतो. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीने आपले मत मांडताना महिलांचा अपमान करणे हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलेले नाही. त्यांनी माफी मागितली असली तरीही त्यांचे वक्तव्य हे निंदनीय आहे. भविष्यात कोणीही अशी विधानं करू नयेत यासाठी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
बंडातात्या यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच स्थानिक आमदार व इतर नेत्यांबाबतही बेताल वक्तव्ये केली आहेत. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हभप या पदवीला मलीन करण्याचा प्रयत्न बंडातात्या कराडकर यांनी केला आहे, अशी टीकाही रूपालीताईंनी केली.
बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन पुकारले आहे. आपल्या नेत्यावर कोणी चिखलफेक करत असेल तर कार्यकर्त्यांना ते सहन होण्यासारखे नाही. मात्र, आंदोलन करताना ते शांततेच्या मार्गाने करून कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन रुपालीताईंनी पक्ष कार्यकर्त्यांना केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.