पुणे

जानकरांचे निकटवर्ती सोलनकर राष्ट्रवादीत

रासपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत काल सुपे येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. बापूराव सोलनकर हे महादेव जानकर यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मिलिंग संगई

बारामती शहर :  रासपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत काल सुपे येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. बापूराव सोलनकर हे महादेव जानकर यांचे निकटवर्तीय मानले जातात.

त्यांनी नुकताच रासपला रामराम करत पदाचा राजीनामा दिला होता. सोलनकर राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे पक्षाला त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद प्राप्त होईल,बापूराव सोलनकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत, महादेव जानकर यांच्या बरोबर त्यांनी अनेक वर्षे काम केले, पण त्यांना न्याय मिळाला नाही. सोलनकर यांचे संघटनात्मक काम चांगले आहे त्याचा फायदा नक्कीच राष्ट्रवादीला होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादीकडून जी जबाबदारी सोपविली जाईल ती पार पाडू असे सोलनकर यांनी या वेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT