Baramati News : शारदानगर (बारामती) येथे अँग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित कृषिक २०२३ या कृषी प्रदर्शनाचे उद्धघाटन आज (गुरुवारी) झाले. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar), विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), राजेंद्र पवार, सुनंदा पवार आदी यावेळी उपस्थित होते.
"शेती विकासाचे ज्ञान देशभर पसरविण्यासाठी बारामतीचे कृषिक प्रदर्शन उपयुक्त आहे. शेतकरी हिताच्या गोष्टी पाहण्यासाठी मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बारामतीला आलो आहे. राजेंद्रदादा (पवार) यांचे कार्य उत्तम आहे," अशा शब्दात सत्तारांनी बारामती कृषिक प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.
विशेष काहीतरी असतेच..
"बहुतेक वेळा कृषी प्रदर्शन स्टॉल, कागदावर आणि भिंत्तीपत्रकाद्वारे पाहावयास मिळतात. मध्यतरी आम्ही सिल्लोडमध्ये (औरंगाबाद) असेच कृषी प्रदर्शन घेतले, परंतु बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे आदर्श धडे थेट शिवारात पहावयास मिळतात. त्यामुळे बारामतीचे कृषिक प्रदर्शन असो,अथवा भिमथडी असो त्यामध्ये विशेष काहीतरी असतेच," असे सत्तार म्हणाले.
अजित पवार म्हणाले..
अजित पवार म्हणाले, "शेतीच्या प्रात्याक्षिकांपासून कंपन्यांच्या तंत्रज्ञानापर्यंत आणि जनावरांच्या प्रदर्शनापासून भिमथडी जत्रेपर्यंत बारामती कृषी विज्ञान केंद्रातील कृषीकने हजारो शेतकऱ्यांची गर्दी खेचली. आधुनिक अवजारे तसेच पिक प्रात्यक्षिकांबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता दिसून येत आहे. त्यामुळे बारामतीचे कृषी प्रदर्शन खरेतर देशभर दाखविण्याची गरज आहे,"
आधुनिक टेक्नॉलाजी
बारामती कृषीक प्रदर्शनामध्ये 170 एकर क्षेत्रावर विविध प्रकारचे प्रयोगशील शेती प्लॉट,निर्यातक्षम पालेभाजा व फळबागा, मशागतीची औजारे, आधुनिक टेक्नॉलाजीच्या आधारे तयार केलेल्या मशनरींपासून ते मीनी रोबो ट्रॅक्टरपर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना पाहावयास मिळत आहे, त्याबाबत कृषीमंत्री अत्तार यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विश्वस्त रणजित पवार, विष्णूपंत हिंगणे, राजेंद्र देशपांडे, डॉ. मगर, सीईओ निलेश नलावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.