Baramati Assembly constituency: 'नातं तुटायला वेळ लागत नाही,' असे सांगत बारामतीत भाषण करताना अजित पवार काल (सोमवारी) भावुक झाले होते. त्यांच्या भाषणाचा संदर्भ घेत आज शरद पवार यांनी अजितदादांच्या भाषणांची नक्कल केली. त्यानंतर उपस्थितांनी घोषणा दिल्या.
काल सभेत अजितदादा भावुक झाले होते. तेव्हा त्यांनी पाणी पिऊन डोळे पुसले होते. शरद पवारांनी आज भाषण कराताना डोळे पुसून अजित पवारांची खिल्ली उडवली. बारामती विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या निशाण्यावर अजित पवार असल्याचे दिसते.
अजितदादांच्या कालच्या भाषणाचा समाचार शरद पवारांनी घेतला. "सहा महिन्यापूर्वी सुप्रियाची निवडणूक होती, सुनेत्रा उभी होती. पण भाषणं काय होती. भावनिक होऊ नका. चांगलं आहे, मग कालच्या सभेत डोळे पुसण्याची गरज काय होती, असं म्हणत पवारांनी अजितदादांना सुनावलं.
बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारपक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार आमने-सामने आहेत. आज युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत पवारांनी अजितदादांना जोरदार टीका केली.
काका अजित पवार विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार या सामन्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत येथे नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध भावजय सुनेत्रा पवार ही लढत रंगदार ठरली होती.सुप्रिया सुळे विजयी ठरल्या आहेत.
काल अजितदादा म्हणाले की लोकसभेला मी चूक केली, मग आता चूक कुणी केली. आई सांगत होती माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभं करू नका, पण माझ्याविरोधात युगेंद्रला उभे केले. लोकसभेच्या वेळी मी चुकलो सुप्रियाच्या विरोधात सूनेत्राला उभं करायला नको होतं. बारामतीने ठरवलं होतं लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. आता कुणीही गावं सोडून इतरत्र प्रचाराला जावू नका. हे मी का सांगतोय, कारण माझच घर एकत्र नाही त्यामुळे सांगतोय,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.