Sunetra Pawar  Sarkarnama
पुणे

Baramati By-Election : मोठी बातमी! बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, 'आमच्या वरिष्ठांशी...'

Vijay Wadettiwar Baramati By-Election Congress : बारामती पोटनिवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तीन तासांचा कालवधी राहिला असताना राज्यातील काँग्रेस नेत्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Roshan More

Baramati By-Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघ्या तीन तासांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चर्चा केली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे.

शरद पवार वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतानाच राज्यातील काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत माघार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी आम्ही निवडणुकीत माघार घेणार असल्याचे हायकमांडला कळवणार असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले, एकुण आमच्या लोकांची भावना लक्षात घेता या निवडणुकीत थांबवे,असे आमचे एक मत झाले आहे. आज प्रदेशाध्यक्ष हायकमांडच्या कानावर ही गोष्ट घालून आम्ही निर्णय घेऊ.

लोकप्रतिनिधीचे निधन झाले तर ती जागा बिनविरोध करायची असा प्रथा परंपरा होती. मात्र मागील काही काळापासून भाजपने ही परंपरा पाळल्याचे दिसून येत नाही. प्रथा परंपरा कोण पाळत नाहीत म्हणून आम्ही यावेळी आम्ही फाॅर्म भरला होता, असे देखील त्यांनी सांगितले.

अजितदादांवर नेता म्हणून अनेकांचे प्रेम होते. महाराष्ट्रातील जनतेमध्ये त्यांचे स्थान होते. त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात असल्याने आम्हा तीन नेत्यांमध्ये एकमत झाले आणि माघारीचा निर्णय झाला, हा निर्णय आम्ही पक्षश्रेष्ठीना कळवू ते योग्य निर्णय घेतील.

फडणवीसांचा सपकाळांना फोन

बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती आहे. काँग्रेसने यापूर्वी भाजपकडून आपल्या संपर्क साधला गेला नव्हता, असे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT