Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Baramati Nagar Parishad Result : पवार 'पाॅवर' पण बारामतीत सहा उमेदवार पराभूत; अजितदादांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले, 'जिल्हा...'

NCP Ajit Pawar : बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

Sudesh Mitkar

Pune News : बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार होते. मात्र न्यायालयीच्या निर्णयामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर काल २० डिसेंबर मतदान झाले आणि आज मतमोजणी झाली. अजित पवारांनी बारामतीमध्ये आपली पाॅवर दाखवली. मात्र, काही प्रभागामध्ये त्यांच्या उमेदवारांना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात खरा सामना रंगला. मात्र काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी खरी रंगत या निवडणुकीत आणल्याचे पाहायला मिळाले. बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सत्ता आली असून त्यांचे सहा उमदेवार पराभूत झाले आहेत.

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.त्यापैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित 33 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणूक निकालात अजित पवार यांचे उमेदवार बहुतांश ठिकाणी आघाडीवर असून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले सचिन सातव देखील तब्बल दहा हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे बारामती मध्ये नगराध्यक्ष हा अजित पवार यांच्या पक्षातच असणार आहे.

मात्र या सर्व विजयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड यांचा पराभव झाला आहे. त्या प्रभाग क्रमांक 10 ब मधून निवडणूक लढवत होत्या. मनीषा संदिप बनकर या अपक्ष उमेदवाराने त्यांचा पराभव केला असून त्यांचं चिन्ह हे ऑटो रिक्षा होते.अनिता गायकवाड यांचा 800 मतांनी पराभव झाला आहे.

जिल्हा कोणाच्या मागे...

सहा जागांवर अजित पवारांच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तीन ठिकाणी अपक्ष,तर प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि एक ठिकाणी बहुजन समाजवादी पक्ष विजयी झाला आहे.

अजित पवार जात असताना त्यांना या विषयी पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, जिल्हा कुणाचे मागे आहे ते बघा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT