Koregaon Bhima news update sarkarnama
पुणे

Koregaon Bhima : विजयस्तंभाकडे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी फिरवली पाठ ; सुषमा अंधारे संतापल्या..

Sushma Andhare : पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक या सरकारमध्ये आहेत.

सरकारनामा ब्युरो

Koregaon Bhima : पेरणे (ता. हवेली) येथील कोरेगाव भीमा येथे आज 205 वा शौर्यदिन साजरा होत आहे. यानिमित्ताने राज्यभरातून लाखोंचा जनसागर येथे लोटला आहे.

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी काल मध्यरात्रीपासून (शनिवार) अनुयायी येथे येत आहेत. शौर्यदिनानिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मिळेल त्या गाडीने अनुयायांनी कोरेगाव येथे दाखल होत आहे.(Battle of Koregaon Bhima anniversary news update)

अनेकांनी आपली नववर्षांची सुरवात विजयस्तंभाला अभिवादनाने केली. आज सकाळपासूनही गर्दी वाढली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील एकही मंत्री, नेता विजयस्तंभाकडे फिरकला नाही, याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज सकाळी विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुषमा अंधारे म्हणाल्या, "सत्तेतील कोणताही मंत्री या ठिकाणी येणे अपेक्षित नाही. पेशवाईचा वसा आणि वारसा चालविणारे लोक या सरकारमध्ये आहेत,"

त्यांचे बोलवते धनी भाजपमध्ये

सुषमा अंधारे यांनी करणी सेनेवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. करणी सेनेकडून या अभिवादन कार्यक्रमासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्याचा समाचार अंधारे यांनी घेतला आहे.

करणी सेनेकडून विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासंदर्भात वादग्रस्त विधान करण्यात आले होते, त्याचा समाचार अंधारेंनी यावेळी घेतला. "या चिल्लर लोकांना मी किंमत देत नाही. यांचे बोलवते धनी ज्या भाजपमध्ये आहेत, त्या भाजप नेत्यांना आंबेडकरी जनता काय आहे हे मी दाखवून देईल," असा घणाघात अंधारे यांनी केला आहे.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी राज्य सरकारने समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणाची तयारी केली आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 5 हजार काँस्टेबल आणि पाचशेहून अधिक वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. या सोहळ्यावर 6 ड्रोन आणि 185 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT