Bajrang Sonwane Sarkarnama
पुणे

Bajrang Sonwane: लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी जरांगे फॅक्टर चालणार का? खासदार बजरंग सोनवणे म्हणाले,...

Beed MP Bajrang Sonwane on Maharashtra Vidhan Sabha Election: मला सर्व समाजातील लोकांनी मतदान केलं आहे. बीड मधील ज्यांना वाटत की आपली ताकद कमी आहे ते लोक जात फॅक्टर पुढे आणत आहेत, मात्र तो फॅक्टर चालणार नाही.

Sudesh Mitkar

Beed News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये कशा प्रकारची गणित राहतील याबाबत त्यांनी माहिती दिली.

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोनवणे म्हणाले, "बीड विधानसभा निवडणुक बाबत शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीत तयारी करा असे सागितले आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे येणाऱ्या लोकांचा कल जास्त आहे, मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पवारसाहेब हे कुणाला प्रवेश घ्यायचा हे ठरवतील," "विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील यांचा इफेक्ट राहणार असल्याचं बजरंग सोनवणे यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यात ओबीसी ओपन वाद नाही काही लोकांनी वैयक्तिक फायद्यासाठी हा वाद निर्माण केला होता, मात्र मला सर्व समाजातील लोकांनी मतदान केलं आहे. बीड मधील ज्यांना वाटत की आपली ताकद कमी आहे. ते लोक जात फॅक्टर पुढे आणत आहेत, मात्र तो फॅक्टर चालणार नाही असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी अप्रत्यक्षपणे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्या दरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, गेल्या दोन पिढ्या झालं त्या फक्त कोयता घासायला लावत आहेत, पण कधीतरी ऊस लावायला सांगा हे कुठेतरी थांबलं पाहिजे, वेळोवेळी कोयता घासायला लावणे चांगले नाही, ऊस लावायला सांगा,पाणी आणले असते तर ऊस लावला असता, गेले दहा वर्ष केंद्रात तुमची सत्ता असताना तुम्ही काय केलं? असा सवाल त्यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता केला.

धनंजय मुंडे यांनी बीडमधून सहाच्या सहा आमदार महायुतीचे येथील असं सांगितलं होतं. याबाबत बोलताना सोनवणे म्हणाले, ते चुकून म्हणाले महायुतीचे सहा आमदार निवडून येतील. तसे नाही तर महाविकास आघाडीचे सहा आमदार निवडून येतील, असे त्यांना म्हणायचं असेल अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली

राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या घोषणांवरती टीका करताना सोनवणे म्हणाले, "सरकारच्या पायाखाली वाळू सरकली आहे. त्यामुळे वेगवेगळे योजना सरकार आणत आहे, या गोष्टी लोकसभा निवडणुकीपूर्वी केल्या असत्या तर म्हणता आलं असतं परंतु या फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जात आहेत,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT