लोकसभेत सपाटून मार खालल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा सरकार आणण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचं पुण्यात 'चिंतन' बैठक पार पडत आहे. या बैठकीच्या माध्यमातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे. यावेळी तारीख लिहून ठेवा विधानसभेला महायुतीचं सरकार येणार, असा कॉन्फिडन्स उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, गुरूपौर्णिमेच्या निमित्त उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचा ( Bjp ) खरा गुरू कोण? यावरही भाष्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, "आज गुरूपौर्णिमा आहे. आपण म्हणतो, 'गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:.' गुरूपौर्णिमेनिमित्त अनेकजण आपल्या गुरूचं दर्शन घेण्यासाठी कुणी शिर्डी, शेगाव, अक्कलकोटला जातात. या सगळ्या गुरूमाऊलींना मी वंदन करतो. पण, आज आपण गुरूपौर्णिमेदिवशी आपल्याला गुरूसारख्या असलेल्या आपला पक्षाच्या अधिवेशनात आलो आहोत."
"आपला गुरू कोण आहे? आपला गुरू आहे, भगवा ध्वज... भगवी पताका... हा आपला गुरू आहे. या परंपवित्र भगव्या ध्वजाला आज यानिमित्तानं मी वंदन करतो. हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री राम, प्रभू श्री कृष्ण, भारतमाता आणि अखंड भारताचा आहे. त्यामुळे या गुरूला मी नमन करतो," असं फडणवीसांनी म्हटलं.
"चार्तुमास हा तपश्चर्येचा मास असतो. संपर्क, संवाद आणि तपश्चर्चेयासाठी चार्तुमासाचा उपयोग केला जातो. पण, आपल्याला हा चार्तुमास संपर्क आणि संवादाचा मास करायचा आहे. 2013 मध्ये याच ठिकाणी आपण अधिवेशन घेतलं होतं. आणि 2014 मध्ये पूर्ण बहुमतानं निवडून आलो. आता पुन्हा इथेच अधिवेशन घेत आहोत. आजची तारीख लिहून ठेवा. या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार निवडून येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. हे शिक्षण, तंत्रज्ञान आणि समाज सुधारकांचं माहेरघर आहे. अशा या पुण्यातून जो विचार निघतो, तो गावागावापर्यंत पोहचतो. भाजपचा विचार गावागावापर्यंत पोहचविण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत," असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.