Pune News : भिगवण पोलिस ठाण्यात आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा तक्रार आई आणि भावाने दिली होती. त्यावरून गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, या प्रकरणात मुलीने पोलिसांच्या समोर हजर होत प्रतिज्ञापत्र दिले. त्यात तिने "ती स्वत: च्या मर्जीने मुलासोबत गेली असल्याचे आणि आम्ही सोबत राहू इच्छितो असे, स्पष्टीकरण दिले. आई-भावाने चुकीचा गुन्हा नोंदवला असल्याचा दावाही तिने केले होते.
पण या प्रकरणात हिंदू संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त करत भिगवण बंदची हाक दिली आणि मोठ्या संख्येने भिगवण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या मोर्चात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या प्रकरणावर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. चाकणकर म्हणाल्या, भिगवण प्रकरणांमध्ये या 2 आमदारांविरोधात तक्रारी आल्या तर महिला आयोग त्यांच्यावर कारवाई करणार आहे. भिगवण प्रकरणांमध्ये पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून कायदा त्यांचं काम करत असतो.
18 वर्ष पूर्ण झालेल्या महिलेला तिच्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो, त्यामुळे कुणीही दोन समजात तेढ निर्माण करू नये. कुणीही वादग्रस्त विधान करू नये. जर तशी विधाने केल्यास त्याबाबतची चौकशी करून कारवाई केली जाते. जर भिगवण प्रकरणात आमदारांच्या विरोधात तक्रारी आल्यास कारवाई करणार असल्याचं रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.