Bhima Koregaon Shouryadin
Bhima Koregaon Shouryadin 
पुणे

Bhima Koregaon Shouryadin : भिमा-कोरेगावात अनुयायांची तुफान गर्दी ; प्रकाश आंबेडकरांनीही केले विजयस्तंभाला अभिवादन

सरकारनामा ब्युरो

Bhima Koregaon Shouryadin : कोरेगाव-भिमा येथे आज २०५ वा शौर्यदिन साजरा होत आहे. भिमा-कोरेगाव विजयस्तंभाला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव शौर्यदिनानिमित्त आज हजारो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. २०१८ प्रमाणे भीमा-कोरेगाव परिसरात कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मध्यरात्रीपासून अनुयायांनी या ठिकाणी जमण्यास सुरुवात केली होती. सामुहिक बुद्धवंदना पठण करुन शौर्यदिनाला सुरुवात करण्यात आली. तर, स्थानिक प्रशासनाच याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सोयीसुविधा पुरण्यात येत आहेत. सकाळी सकाळीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीदेखी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहचले होते.

कोरेगाव भिमा परिसरातील सोहळ्याला यात्रेचं स्वरूप आले आहे. आनंदाच्या वातावरणात सर्व नागरिकांनी अगदी शांत आणि सोहळ्याला सुरवात केली. राज्यभरातून लाखो अनुयायी या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यास पोहचत आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राजकीय नेतेमंडळींनीही विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी तिथे उपस्थिती लावली होती.

'' १ जानेवारी १८१८ मध्ये इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या सैन्यात मोठी लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या महार सैनिकांनी ही लढाई जिंकली. ब्रिटिशांच्या विजयाचा जल्लोष आजही दलित समाज मोठ्या प्रमाणात साजरा करतो. पण त्या काळी महार समाजातील लोकांना अस्पृश्य मानले जात असे. त्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिन साजरा केला जातो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT