A view of political leaders and party workers during the Bhor Municipal Election campaign. The image highlights the shifting alliances and rising tension between BJP and NCP. Sarkarnama
पुणे

Mahayuti Politics : शिंदेंचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारच अजितदादांनी पळवला, आता उमेदवारी अर्ज मागे घेत करणार राष्ट्रवादीचं काम

Bhor Municipal Election : पूर्वी भोरमध्ये भाजपची ताकद मर्यादित होती. मात्र भाजपने माजी आमदार संग्राम थोपटे यांना पक्ष प्रवेश दिल्याने संग्राम थोपटे यांच्या रूपाने भाजपची या ठिकाणची ताकद वाढली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच संग्राम थोपटेंच्या पुढे आव्हान निर्माण करत आला आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 19 Nov : राज्यामध्ये महायुतीमध्ये असलेले भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांसमोर ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर या तिन्ही पक्षांमध्ये कुघोडीचं राजकारण सुरू आहे.

राज्यात मित्र असलेले हे पक्ष स्थानिक निवडणुकीमध्ये मात्र एकामेकांचे कट्टर विरोधक असल्याप्रमाणे शहकाटशहाचं राजकारण करत आहेत. भोर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात टाकले असल्याचे पाहायला मिळत आहे.

पूर्वी भोरमध्ये भाजपची ताकद मर्यादित होती. मात्र भाजपने माजी आमदार संग्राम थोपटे यांना पक्ष प्रवेश दिल्याने संग्राम थोपटे यांच्या रूपाने भाजपची या ठिकाणची ताकद वाढली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच संग्राम थोपटेंच्या पुढे आव्हान निर्माण करत आला आहे.

त्यामुळे भोर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने संग्राम थोपटे यांची भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमने-सामने आली आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने देखील आव्हान निर्माण केलं आहे.

मात्र हे आव्हान अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोडीत काढल्याचं पाहायला मिळत आहे. भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी, शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या भोर शहर प्रमुख नितीन सोनवले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडून आणण्यात आला आहे.

अशा प्रकारे शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचाच उमेदवार अजित पवारच्या राष्ट्रवादीने पळवला असल्याचे पहिला मिळत आहे. हा प्रवेश राष्ट्रवादीचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला असून सोनवले यांनी शिवसेनेकडून भरलेला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज आता ते माघारी घेणार असून निवडणूकीत राष्ट्रवादीसाठी काम करणार आहेत.

यामाध्यमातून भोर नगरपालिकेवर भाजपचे संग्राम थोपटे यांचं वर्चस्व असल्याने, भाजपला चितपट करण्यासाठी डाव राष्ट्रवादीने आखला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने भोर नगरपालिका निवडणुकीत आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा महायुतीतच सामना रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT