Pune News : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सुनामी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 52 जागा जिंकल्या. एकीकडे एवढा मोठा विजय होत असताना दुसरीकडे मात्र अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना देखील करावा लागला. त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला पराभव म्हणजे मागील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्या रणजीत शिवतरे यांचा माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नीने केलेला पराभव.
भोर तालुक्याला अनेक वर्षानंतर रणजीत शिवतरे यांच्या रूपाने उपाध्यक्ष पद मिळालं होतं आणि त्यांच्याच रूपाने यंदा अध्यक्ष पद देखील मिळेल अशी अशा भोरवासीयांना होती. मात्र गणित फिरली आणि काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आपली ताकद दाखवत शिवतरेंचा पराभव केला.
शिवतरे यांच्या पराभवामुळे यंदा भोरचे अध्यक्ष पदाची संधी हुकली ही चर्चा सुरू असतानाच भोर मधून अध्यक्षपदासाठी आणखी एक नाव जोरदार चर्चेत आल आहे. राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड यांनी विजय मिळवल्याने भोरचा दावा अद्याप कायम असल्याचे भोर मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा म्हणणे आहे.
भोर मधील जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी दोन जागा या राष्ट्रवादीला तर दोन जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यातील एका जागेवर विक्रम खुटवड हे भोंगवली-कामथडी गटातून निवडून आले आहेत. अध्यक्ष पदासाठी भोरचा विचार झाल्यास निष्ठा आणि अनुभवाचा विचार करून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास 44 वर्षांचा प्रदीर्घ काळा नंतर भोरला अध्यक्षपदाची संधी मिळू शकते.इतिहास काय सांगतो
भोर तालुक्याच्या पूर्व भागातील टापरेवाडी येथील निवासी, भोर पंचायत समितीचे माजी सभापती, राज्य सहकारी बँक तसेच भू-विकास बँकेचे माजी अध्यक्ष आणि सहकार महर्षी दिवंगत माधवराव टापरे यांनी 1982 मध्ये पुणे जिल्हा परिषदेवर निवडून येऊन अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर गेल्या चार दशकांहून अधिक काळ, म्हणजे 40 वर्षे, भोर तालुक्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही.
रणजित शिवतरे हे या पदाचे अत्यंत प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु त्यांच्या पराभवानंतर आता विक्रम खुटवड यांच्या रूपाने भोर तालुक्यात पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आशा तीव्रपणे पल्लवित झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.