-जयंत जाधव
PCMC Bhosari News : महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 भोसरीतील रामनगर-सावंतनगर-गवळीनगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते अजित गव्हाणे यांनी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे पक्षाच्या अन्य इच्छुक व पदाधिकारांचे खच्चीकरण झाल्याची चर्चा आहे. नेता किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीच मैदानात नसल्याने कार्यकत्यांचे अवसान गळाल्याचे बोलले जात आहे.
गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष असून त्यांनी 2024 मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. गव्हाणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत 2002 पासून सलग चार वेळा नगरसेवक होते. त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदही भूषविले आहे. मागील निवडणुकीत सॅंडविक कॉलनी-गवळीनगर प्रभाग क्रमांक पाचमधून अजित गव्हाणे यांनी आमदार महेश लांडगे यांचे बंधू तथा कामगार नेते सचिन लांडगे यांना पराभूत केले होते.
या पराभवाचा वचपा आमदार लांडगे यांच्याकडून या निवडणुकीत काढला जाणार होता, अशी चर्चा आहे. अजित गव्हाणे यांच्याबरोबर मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनुराधा गोफणे याही विजयी झाल्या होत्या. पण, त्यांनी यावेळी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई फुगे व प्रियांका बारसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात लढत आहे. दरम्यान, या परिस्थितीबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता, अजित गव्हाणे उपलब्ध झाले नाहीत.
आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढल्याने यावेळी विरोधी पक्षांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी माघार माजी नगरसेवक जालिंदर शिंदे यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांना प्रभाग पाचमधून उमेदवारी मिळाल्याने अजित गव्हाणे यांचे मानसिक बळ घटले
विधानसभा निवडणूक लढल्याने महापालिका निवडणुकीत हरल्यास राजकीय कारकीर्द अडचणीत येऊ नये, म्हणून ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ ही भूमिका घेऊन शांत राहण्याची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वातावरण काहीही बदलू शकते. म्हणून प्रभाग पाचमधून भाजपने जालिंदर शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे. आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे यांचा ‘डमी’ अर्ज दाखल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.