PCMC Latest News Sarkarnama
पुणे

PCMC News : पिंपरी महापालिका आयुक्तांची मोठी घोषणा ; दिवाळीसाठी 40 हजार ते अडीच लाखांपर्यंत बोनस मिळणार

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर दिली आहे.पिंपरी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी सोमवारी दिवाळी बोनसची घोषणा सोमवारी केली.त्यानुसार किमान महिन्याच्या पगाराएवढा हा बोनस या महिन्याच्या पगाराअगोदर दिवाळीपूर्वीच त्यांना मिळणार आहे.

पिंपरी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह( Shekhar Singh) यांनी साडेआठ टक्के सानुग्रह अनुदानाशिवाय वीस हजार रुपये जादा बोनस म्हणून मिळणार आहे.अशा ५५ कोटी रुपयांच्या बोनसची घोषणा आयुक्तांनी सोमवारी केली. त्यानुसार क्लास फोरला किमान चाळीस हजार,तर क्लास वन अधिकाऱ्याला अडीच लाख रुपये बोनस मिळणार आहे.

अनेक अधिकारी त्यातून लखपती होणार आहेत.पालिका आयुक्तांना तो किमान दोन लाख मिळेल.तर,त्यांच्यापेक्षाही पालिका रुग्णालयातील काही ज्येष्ठ डॉक्टरांना तो जास्त म्हणजे अडीच लाख रुपयांपर्यंत मिळेल,असे पालिकेच्या अकाऊंट विभागातून सांगण्यात आले.(PCMC News)

राज्यातील मोजक्याच हातावर मोजता येतील इतक्याच महापालिका दरवर्षी बोनस देत आहेत.मुंबई ही सर्वात मोठी आणि केरळ राज्याएवढा अर्थसंकल्प असलेली महापालिका तो देत नाही. पुणे महापालिकेच्या अगोदर तो जाहीर करून पिंपरी पालिकेने यावर्षी आघाडी घेतली.या वर्षी सेवानिवृत्त झालेले,राजीनामा दिलेले, व्हीआरएस घेतलेले तसेच निलंबित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही बोनस मिळणार आहे.

फक्त सहा महिन्यापेक्षा कमी सेवा झालेले नवीन कर्मचारी आणि अधिकारी यापासून वंचित राहणार आहेत. तर,मानधनावरील अधिकारी,कर्मचारी यांना वीस हजार रुपये दिले जाणार आहेत.

दरवर्षी महापालिकेच्या वर्धापनदिनी बोनस जाहीर करण्याची म्हणजे त्याचा आदेश काढण्याची पिंपरी पालिकेत गेल्या वीस वर्षांपासूनची परंपरा आहे.ती यावेळीही पाळली गेल्याने कर्मचारी सुखावला गेला.त्यांनी आनंद व्यक्त केला.वेळेत बोनस दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजूर्डे यांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.(Diwali Bonus)

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT