Sushma Andhare
Sushma Andhare Sarkarnama
पुणे

Sushma Andhare : मोठी बातमी ! सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार...

अनुराधा धावडे

Sushma Andhare : मुंबई : राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटाची धडाडणारी तोफ म्हणून सुषमा अंंधारे यांच्याकडे पाहिले जाते. आता याच सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. टेंभी नाका येथील आनंद मठात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. हा सुषमा अंधारेंसाठी मोठी धक्का मानला जात आहे.

यावर सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे. वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं की ' गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही दोघं विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका मला पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचे वैजनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे. आपण एकनाथ शिंदे यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनही हो म्हटलं आणि आज मी शिंदे गटात प्रवेश करत आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू, असे वाघमारे यांनी म्हटलं आहे.

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार आहे. राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांना शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत त्यांना उपनेतेपद देण्यात आले. सुषमा अंधारे यांनी अवघ्या तीन महिन्यातच पक्षात आणि राज्यात आपली छाप उमटवली. आपल्या अचूक आणि अभ्यासपूर्ण बोलण्यातून त्यांनी भाजप आणि शिंदे गटालाही विरोधकांना सळो की पळो करून सोडलं.

महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून अंधारेंनी शिंदे गटांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट हल्लाबोल केला. त्यामुळे बंडखोर नेत्यांची पळताभूई थोडी झाली आहे. पण अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाने थेट अंधारे यांच्याच घरातच फुट पाडली आहे. अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनाच गळाला लावण्याचा प्रयत्न करून शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. आता शिंदे गटाच्या या राजकीय खेळीला आता सुषमा अंधारे कसं उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT