PCMC Mayor Usha Dhore Sarkarnama
पुणे

स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनिमित्त ७५ तास कोरोना लसीकरण मोहीमेला मोठा प्रतिसाद!

केंद्र सरकारने (Central Government) 'आझादी का अमृत महोत्सव' भरविण्याचा आदेश नुकताच दिला आहे. त्यानुसार पिंपरी महापालिकेत (PCMC) १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जात आहे.

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : स्वातंत्र्याच्या (Independence Day)अमृतमहोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड (PCMC)महापालिकेने आपल्या तीन नाट्यगृहामध्ये सलग ७५ तास कोरोना  प्रतिबंधक लसीकरण मोहीम गुरूवारपासून (ता.३० सप्टेंबर) सुरू केली आहे. शुक्रवारी (ता.१ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३१ तासातच ५ हजार ५२३ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, या मोहिमेंतर्गत जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे (PCMC Mayor) यांनी संगितले.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, सांगवीतील निळू फुले नाटयगृह, तर, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात गुरूवारी सकाळी दहा वाजता लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक लसीकरण भोसरीत २ हजार ५४३ झाले. सांगवीत १ हजार ५५२ तर, चिंचवडमध्ये १ हजार ४२८ जणांना लस देण्यात आली. याबाबतची माहिती पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सरकारनामाला दिली.

केंद्र सरकारने "आझादी का अमृत महोत्सव" भरविण्याचा आदेश नुकताच दिला आहे. त्यानुसार पिंपरी पालिका तो १ ते ३ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत नागरिकांसाठी सलग ७५ तास विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे महापौरांनी केले. याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. योग सत्र, झुम्बा, जिजामाता हास्य क्लबचा हास्य कार्यक्रम, इंदौरच्या धरतीवर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे पथनाटय, वॉल पेटींग यासह ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले गार्डनचा शुभारंभही करण्यात आला.

पालिकेने यानिमित्त आयोजित केलेल्या उपपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होत 'आझादी का अमृत महोत्सवाचे' साक्षीदार व्हावे, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. प्रगतशील भारताची ७५ वर्षे, भारत, भारतीय नागरिक, भारतीय संस्कृती आणि भारताचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचे विविध क्षेत्रातील यश याचे स्मरण करण्यासाठी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. तो नागरिकांना समर्पित करण्यात आला आहे. देशवासियांच्या योगदानामुळेच आपला देश या दीर्घकाळाच्या प्रवासामध्ये महत्त्वाचा टप्पा गाठू शकला. त्यामुळे देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या इतिहासाचा जागर आणि यशाचे स्मरण करण्याची संधी शहरवासीयांना उपलब्ध झाली असल्याचे महापौर ढोरे म्हणाल्या. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, महापालिका आयुक्त राजेश पाटील, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, नगरसेविका उषा मुंढे, निर्मला कुटे, आरती चौंधे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT