Santosh Jadhav
Santosh Jadhav  
पुणे

सिद्धू मुसेवाला प्रकरणाला युटर्न; संशयित संतोष जाधवचा मोठा खुलासा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी संतोष जाधवने धक्कादायक खुलासे केले आहेत. मुसेवाला हत्या प्रकरणात आपला काहीही सहभाग नाही. त्याच्या मृत्यूच्या दिवशी आपण पंजाबमध्ये नाही तर गुजरातमधील मुद्रा पोर्टजवळील एका हॉटेलमध्ये होतो. असे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यामुळे आता सिद्धू मुसेवाला हत्याकांडात संतोष जाधव खरंच सहभागी होता का? मुसेवालाला संतोष जाधवने (Santosh Jadhav) गोळी मारली होती की इतर कोणी? मुसेवाला यांच्या हत्येसाठी बिश्नोई गँगने खरंच जाधवला सांगितलं होतं का? या कटात तो सामील नसेल तर संतोष जाधव गुजरातमध्ये लपून का बसला होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुणे क्राईम ब्रँचचे एक पथक गुजरात आणि मध्यप्रदेशात माहिती मिळवण्यासाठी पाठवण्यात आली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहिती संतोष जाधवने अनेक खुलासे केले आहेत. 'सिद्धू मुसेवालाची हत्या झाली त्या दिवशी म्हणजे 29 मे रोजी तो गुजरातमध्ये मुद्रापोर्टजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये होता. मुसेवालाची हत्या होण्याच्या तीन दिवस आधीपासून 29 मेपर्य़ंत हत्येनंतर जवळपास 7 दिवस तो याच हॉटेलमध्ये थांबलो असल्याचे संतोषने पोलिसांना सांगितले.

पण पंजाब पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी त्याचे फोटो लावल्याने तो चांगलाच घाबरला होता. आपण पकडले जाऊ या भितीने त्याने डोक्यावरचे केस काढले. दाढी, मिशा काढल्या त्याने आपला संपूर्ण पेहराव बदलला आणि हॉटेलमधून बाहेर पडला.

हे प्रकरण चिघळत चालल्याचे लक्षात येताच त्याने नेपाळला पळून जाण्याची योजना आखली.पण त्याचे फोटो सगळीकडे लावले गेल्याने काहीही हालचाल केल्यास तो पकडला जावू शकतो. यामुळे त्याने त्याच्या मित्राला संपर्क साधला. मित्र नवनाथ सूर्यवंशीकडेे त्याने काही दिवस लपण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यावर नवनाथने संतोष जाधवची भूज येथील एका घरात त्याची लपण्याची पूर्ण व्यवस्था केली. नवनाथने त्याला त्याच्याजवळील मोबाईल सुद्धा दिला. नवनाथ त्याच्या जेवणाची आणि इतर सर्व गरजेच्या वस्तुंची व्यवस्था करत होता. पण कोणावर विश्वास ठेवायचा हेच त्याला कळत नव्हते. अशात पुणे क्राईम ब्राँचच्या पथकाने अचानक याठिकाणी छापा टाकला आणि त्या दोघानांही अटक केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT