Ashwini Jagtap and Hemant Rasane
Ashwini Jagtap and Hemant Rasane  Sarkarnama
पुणे

Election News : मोठी बातमी! भाजपचे उमेदवार जाहीर; कसब्यासाठी हेमंत रासने तर चिंचवडसाठी अश्विनी जगताप

सरकारनामा ब्यूरो

Kasaba And Chinchwad By-election News : पुण्यातील कसबा तर पिंपरीतील चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीचे वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलेच तापले आहे. आज या दोन्ही मतदारसंघासाठी भाजपाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

यामध्ये कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

मागील काही दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप (BJP) उमेदवार घोषित करण्याच्या हालचाली करत होतं. अखेर आज अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीचे (NCP) देखील या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांबाबत आज ठरणार आहे. त्यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT