Bjp ,congress Pune News
Bjp ,congress Pune News  Sarkarnama
पुणे

Kasba By Election : कसब्यातील निवडणुकीसाठी भाजप-काँग्रेस अॅक्शन मोडवर : बैठकांचा सपाटा; कोण असेल उमेदवार ?

सरकारनामा ब्यूरो

Pune News : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली आहे. कारण काँग्रेस पक्षाने ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप-काँग्रेस अॅक्शन मोडवर आली असून बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे.

भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोमवारी(दि.२३) कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. शहर पातळीवरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी होणार आहे. या बैठकीत निवडणुकीच्यादृष्टीने तयारीचा आढावा घेण्यात येईल असं सांगण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता जोर धरू लागली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या (Bjp) वतीने उमेदवार कोण असेल याबाबत ही उत्सुकता आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे.

भाजपच्यावतीने शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं जातं की, ऐनवेळी टिळक कुटुंबाबाहेरच्या नावाला प्राधान्य दिलं जातं याविषयी उत्सुकता आहे. मात्र राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश टिळक यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आज पुण्यात येणार आहेत. त्यांच्यासोबत कसबा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवाराबाबत चर्चा होऊन निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. काँग्रेसकडून प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी आणि बाळासाहेब दाभेकर या पाचजणांची नाव प्रदेश काँग्रेस (Congress) कडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या पाच जणांपैकी रवींद्र धंगेकर किंवा अरविंद शिंदे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे.

नाना पटोले यांच्या आजच्या पुणे भेटीत कसबा विधानसभा मतदारसंघात कोणत्या प्रकारे निवडणूक लढवता येईल. याची आखणी करण्यात येणार असून उमेदवारी बाबत देखील चर्चा करण्यात येणार असल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT