पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे (BJP) नगरसेवक रवी लांडगे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपचे आमदार आणि पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या मतदार संघातच भाजपला धक्का बसला आहे.
रवी लांडगे अनेक दिवसापासून भाजपवर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी शुक्रवारी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यांचे पती माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी अगोदरच भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. नगरसेवकपदाची माया बारणेंची लागोपाठ ही दुसरी टर्म होती. २०१२ ला त्या राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा, तर गतवेळी भाजपकडून निवडून आल्या होत्या. मात्र, गेल्या पाच वर्षात कुठलेही महत्वाचे पद न मिळाल्याने त्या नाराज होत्या. परिणामी काही महिन्यांपासून त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे थांबवले होते. त्यातून त्या पक्ष सोडणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानतर आता लांडगे काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
आशिया खंडात श्रीमंत पिंपरी महापालिका भाजप राजवटीत भ्रष्टाचारी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे शहराची बदनामी होत आहे, असा हल्लाबोल माया बारणे यांनी केला होता. शहरातील भाजप नेतृत्वावर कडाडून टीका करताना त्यांना हुजरेगिरी करणारे नगरसेवक हवेत. स्वावलंबी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणारे नकोत, असे त्या म्हणाल्या होत्या. लाचखोरीत अटक झालेल्या स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापतीविरुद्ध त्यांनी कारवाई केली नाही. उलट त्यांचे समर्थने केले. हे शहराचे दुर्दैव आहे. त्यातून भाजप पदाधिकारी भ्रष्टाचाराला साथ देतात, हे स्पष्ट झाले, अशी तोफ त्यांनी डागली होती.
वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणि स्मार्ट सिटीच्या कामातही भ्रष्टाचार केला. भाजपच्या दबावामुळे प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही. भामा आसखेड धरणातून त्यांना पाणी आणता आले नाही. परिणामी शहरात गेल्या चार वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. टॅंकरमाफियांना पोसण्यासाठी त्यांनी कृत्रिम पाणीटंचाई शहरात निर्माण केली, अशा आरोपांच्या फैरी बारणे यांनी झाडल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.