PCMC BJP Corporator Resigns  sarkarnama
पुणे

PCMC तील भाजपची गळती थांबेना : फडणविसांनी विनंती करूनही नगरसेविकेचा राजीनामा!

महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) मध्ये भाजपला मोठी गळती लागली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) मध्ये भाजपला मोठी गळती लागली आहे. पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या चंदा लोखंडे या आणखी एका नगरसेविकेने राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपला (BJP) पिंपरी-चिंचवडमध्ये दुसरा धक्का बसला आहे. ही गळती थांबविण्यासाठी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

महापालिका निवडणुकीपूर्वी (Municipal Elections) पक्ष सोडून जाऊ नये, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपमधील काही नाराज नगरसेवकांना केली आहे. नाराज नगरसेवकांना त्यांनी स्वतः फोन करून ही विनंती केली, अशी विश्‍वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपमधील जवळपास पंधरा-सोळा नाराज नगरसेवक पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (PCMC BJP Corporator Resigns)

काही दिवसापूर्वी भाजपचे नगरसेवक वसंत बोऱ्हाडे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भाजपमधील गळती रोखण्याचे मोठे आव्हान फडणवीस यांच्यासमोर असणार आहे. भाजपमध्ये नागरिकांची विकास कामे करण्यात अनेक अडचणी येत असल्याने आम्ही पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याचे वसंत बोऱ्हाडे यांनी सांगितले होते.

दरम्यान, वंसत वसंत बोऱ्हाडे यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बोराटेंचा प्रवेश झाला होता. राजकीय दबावाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आक्षेप घेत भोसरीचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बोराटे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे ते नगरसेवक असलेल्या मोशी भागातील राजकीय गणिते बदलणार आहेत. तसेच ते नगरसेवक असलेल्या वॉर्डातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये अस्वस्था वाढली आहे. त्यांच्या प्रवेशात प्रा. आल्हाट यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याचे समजते.

बोराटे हे आमदार लांडगेंच्या मतदारसंघातील असूनही त्यांनी बोराटेंच्या राजीनाम्यानंतर संयमी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, बोराटेनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच लांडगेंच्या कट्टर समर्थकांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. समाविष्ट गावांवर २० वर्षे अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पंगतीला बोराटेंनी जाणे दुर्दैवी असल्याचे माजी महापौर व नगरसेवक राहुल जाधव म्हणाले होते. पिंपरी पालिकेत गावे समाविष्ट होवून २० वर्षे तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने विकासकामांच्या बाबतीत आणि महत्त्वाच्या पदासाठी समाविष्ट गावांवर अन्याय केला. बोराटेंनी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राष्ट्रवादीच्या पंगतीत बसून, समाविष्ट गावांचा स्वाभिमान दुखावला,असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT