Bjp Finalised Sujitsinh Thakur Name for Leader of Opposition in Legislative Council
Bjp Finalised Sujitsinh Thakur Name for Leader of Opposition in Legislative Council 
पुणे

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी सुजीतसिंह ठाकुर जवळ पास नक्की

उमेश घोंगडे

पुणे : विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी आमदार सुजीतसिंह ठाकुर यांचे नाव जवळपास नक्की झाले आहे.ठाकुर यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. पक्षातील विश्वसनीय सूत्रानी दिलेल्या महितीनुसार ठाकुर यांच्या नावाला पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी संमती दिली आहे. 

या पदासाठी पक्षातील अन्य नावांची चर्चा झाली. मात्र, पक्ष नेतृत्वाने ठाकुर यांच्या नावाला अधिक पसंती दिल्याचे सूत्रानी  सांगितले. विरोधी पक्षनेत्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच होणार होती. मात्र, पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळीतील मेळावा. त्याची राज्यभर झालेली चर्चा यामुळे ठाकुर यांच्या निवडीचा विषय मागे पडला होता. 

पक्षातील नाराजांचा रोख फडणवीस यांच्याकडे असला तरीही या पदासाठी फडणवीस यांचे विश्वासू असलेले ठाकुर यांचीच पक्षाने निवड केली असल्याचे सुत्रानी सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांनी पक्ष नेत्यावर केलेल्या जाहीर टीकेमुळ पक्ष नेतृत्व या दोघांवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT