<div class="paragraphs"><p>Tushar Kamthe</p></div>

Tushar Kamthe

 

Sarkarnaama

पुणे

पक्षाच्या नगरसेवकांमुळेच पिंपरीत भाजपची पंचाईत

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महापालिकेची (PCMC) या महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता.२४ डिसेंबर) झाली. त्यात आयुक्तांवरील (PCMC Commissioner Rajesh Patil) टीकेवरून भाजपला (BJP) पहिला घरचा आहेर त्यांचेच नगरसेवक संदीप वाघेरे (Sandeep Waghere) यांनी दिला. तर, दुसरा घरचा आहेर भाजपला त्यांचे दुसरे नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamthe) यांच्याकडू मिळाला. योगायोगाने हे दोन्ही नगरसेवक शहर कारभारी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघातील आहेत.

बोगस कागदपत्रे सादर करुन रस्ते-गटर सफाईच्या निविदेत तब्बल ५५ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सुरू असल्याचा विषय कामठे यांनी आमसभेत उपस्थित केला. त्यामुळे 'अ' आणि 'ब' क्षेत्रीय कार्यालयांच्या या निविदे प्रक्रियेवरुन प्रशासन आणि काही पदाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, संबंधित निविदा ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद (जि.पुणे) आणि तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन अनुभव कागदपत्रे आणि बोगस लेटरहेड सादर करून हे काम मिळवल्याचे कामठे यांनी पुराव्यानिशी सभागृहाच्या निदर्शनास आणले. यावर पालिका दक्षता समिती काय तपास करते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंदापूर नगरपरिषदेतील बोगस कागदपत्रे सभागृहात सादर करु नको म्हणून मला तीन तास समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी धमकीही देण्यात आली, असा दावा त्यांनी केला. मात्र, राजकीय दबाव आणि धमकीला मी घाबरणार नाही. कारण सर्वसामान्य जनता माझ्या सोबत आहे, असे ते म्हणाले. अ, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या रस्ते गटर सफाई कामात राजकीय हस्तक्षेप करुन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे सादर करुन या कामाचा ठेका मिळवण्याचा घाट घातला आहे. त्याला सभागृहातील एका ज्येष्ठ सदस्याने हातभार असल्याचा गंभीर व खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

अन्यथा नगरसेवकपदाचा त्याग करणार

कामठे भाजपाने भ्रष्टाचारमुक्त कारभार या मुद्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवून जिंकली. त्यामुळे ज्या-ज्या वेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे आला, त्या-त्या वेळी न डगमगता माझी भूमिका मांडली. वर्षाच्या शेवटी समोर आणलेल्या या आणखी एक नव्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा छडा महापालिका आयुक्तांनीच लावावा. कारण रस्ते गटर सफाईच्या निविदा प्रकियेत निर्णय घेण्याचे अधिकार एका लाच प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्याकडे दिले आहेत. त्यात अनियमितता असून, याबाबत सखोल चौकशी करून येत्या आठ दिवसांत त्याचा अहवाल सादर करावा. अन्यथा नगरसेवकपदाचा त्याग करुन करदात्यांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे, अशा इशाराही कामठे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT