Jagdish Mulik on NCP jayant patils ed summons
Jagdish Mulik on NCP jayant patils ed summons Sarkarnama
पुणे

Jayant Patils ED Summons: जयंतराव, कर नाही, तर डर कशाला ? ; ED च्या नोटीसवरुन भाजपनं डिवचलं ; भावनिक कार्ड सोडा..

सरकारनामा ब्यूरो

BJP on Jayant Patils ED Summons: देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तांतराच्या सुनावणीच्या अंतिम निर्णय येण्याआधी काही तास अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांना ईडीनं (ED) नोटीस पाठवली आहे. या नोटीसीला जयंत पाटलांनी दुजोरा दिला आहे.

जयंतरावांचा काल (गुरुवारी) लग्नाचा वाढदिवस होता, अनेकांच्या शुभेच्छा घेत असताना संध्याकाळी पाचच्या सुमारास एका हवालदाराने त्यांच्या हातावर ईडीची नोटीस ठेवली, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.

जयंतराव पाटील यांना मिळालेल्या या नोटीशीवरुन पुणे भाजपचे शहाराध्यक्ष, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी टीकास्त्र सोडलं आहे. मुळीक यांनी टि्वट करीत जयंत पाटलांवर टीका केली आहे.

"जयंत पाटील, भावनिक कार्ड सोडा, मुद्द्याचं बोला ! महाराष्ट्राला लाभलेले नव ‘नटसम्राट’ जयंत पाटील यांना ED ची नोटीस आली आणि त्यांच्या नाटकाचा नवा अंक सुरु झालाय…" अशा शब्दात जगदीश मुळीक यांनी जयंत पाटलांची खिल्ली उडवली आहे.

"नवाब मलिक पण बोलले की ते निर्दोष होते, मग अजून जामीन का होईना? भावनिक खेळ सोडा आणि ज्याबद्दल नोटीस आली आहे त्याबद्दल मुद्द्याचे बोला ! जयंत पाटील,कर नाही, तर डर कशाला?" असे मुळीक यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

या नोटीशीवर जयंत पाटील म्हणाले. "आपण नक्कीच नोटीसीला उत्तर देणार आहोत. पण सध्या घरात जवळच्या नातेवाईकांची लग्न असल्याने अजून 2-3 दिवसांचा कालावधी घेणार आहे,"

ईडीच्या नोटीसीमध्ये जयंत पाटील यांना आज ईडी कार्यालयामध्ये दाखल होण्यास सांगितले आहे पण आता पाटील वेळ वाढवून घेणार असल्याने पुढील आठवड्यात हजर राहू शकतात.जयंत पाटील यांनी मीडीयाशी बोलताना आपला ज्या कंपनीशी संबंध नाही त्याच्या प्रकरणात नोटीस आली आहे पण अशा ईडी नोटीसा का येतात? हे सर्वांना ठाऊक आहे असेही ते म्हणाले.

IL&FS प्रकरणी यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील चौकशी झाली आहे. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT