Dhananjay Munde & Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

धनंजय मुंडे, मला बोलायला लावू नका : पाटलांचा गर्भित इशारा

"त्या सूत्रांची हिंमत असेल तर नाव सांगा, त्यांना हे माहिती नाही की, पाटील काय चीज आहे." असे देखील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बोलून दाखवले.

Vishnu Sanap

पुणे : "मी अशिक्षित घरात वाढललो असूनसुद्धा खूप संस्कृती पाळतो. त्यामुळे धनंजय मुंडेंनी त्यांचा भूतकाळ आठवावा आणि मगच देवेंद्र फडणवीसांवर बोलावे" असा थेट हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेंचे देवेंद्र फडणवीसांकडे असलेले येणेजाणे आणि अजित पवार आणि फडणवीस यांच्या शपथविधीमध्ये त्यांचा काय रोल होता? याबाबत त्यांनी आपल्याला जाहीरपणे बोलायला लावू नका, असे आव्हानही मुंडेंना केले आहे. मुंडे यांना एका मुलाखतीदरम्यान फडणवीस यांचा एक गुण आणि सल्ला विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी फडणवीसांनी आता मी पुन्हा येईन असे वांरवार न म्हणता किमान 2024 पर्यंत तरी असे बोलू नये, असा सल्ला त्यांनी दिला होता. याबाबत पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, फडणवीस व पाटील यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व आणि पक्षश्रेष्ठी हे पाटलांच्या कामकाजावर नाराज असून, भाजपात संघटनात्मक फेरबदल होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आज (ता.28 नोव्हेंबर) पाटील यांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, जे अशाप्रकारच्या चर्चा करतात "त्या सूत्रांची हिंमत असेल तर नाव सांगा, त्यांना हे माहिती नाही की, पाटील काय चीज आहे," असे देखील त्यांनी बोलून दाखवले.

याबरोबरच, महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, राज्यातील सर्वच जनता सरकारवर नाराज असून हे सरकार फक्त वसुली करण्यावर लक्ष देणारे सरकार आहे, असा घणाघात पाटील यांनी केला आहे. तसेच, आतापर्यंत सरकारच्या दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला असून वळसे पाटलांना बळेच गृहमंत्री करण्यात आल्याची टीकाही पाटील यांनी केली. तसेच, राज्यात काय चालले आहे. कुणाचा कुणाला मेळ नाही, असे पाटील म्हणाले.

Edited By : Vishnu Sanap

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT