Chandrakant Patil News Updates
Chandrakant Patil News Updates Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीचे सत्तेचे स्वप्न उधळून लावू : चंद्रकांतदादांनी फुंकले रणशिंग

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महानगरपालिका भारतीय जनता पार्टीकडून ताब्यात घेण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पाहत असली तरी त्या पक्षाच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल आणि भाजपा पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवेल, अशी विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याजवळील मांजरी येथे व्यक्त केला. त्यांनी आज (ता. 8 फेब्रवारी) पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना भेट दिली त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Chandrakant Patil News Updates)

पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा वापर करून महानगरपालिकेत नव्याने काही गावांचा समावेश केला आहे. यामुळे पुणे महापालिकेचे क्षेत्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे झाले आहे. त्यामुळे आता पालिकेचे प्रशासन चालवायचे कसे हे सोडून द्या फक्त सत्ता कशी मिळवायची एवढेच राष्ट्रवादीच्या मनात आहे. प्रभागांची मोडतोड करण्यात आली असून तुकडे-तुकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे ते मनातले मांडे खात आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ झालेले मतदार या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे भाजपालाच मते मिळतील. भाजपाचा मतदार सर्वत्र कायमच आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपा पूर्ण बहुमताने जिंकेल आणि पुणे महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या राष्ट्रवादीच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल, असा टोला पाटलांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

भाजपने पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात पुणे महानगरपालिका क्षेत्रात भरघोस कामगिरी केली आहे. मेट्रो, रुग्णालय, रस्ते, बस वाहतूक अशा विविध क्षेत्रात भाजपाने प्रभावी काम केले आहे. आगामी काळात पुणे महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालयही होईल. भाजपा आपल्या कामांची यादी घेऊन मतदारांसमोर जाईल आणि त्यापूर्वी पन्नास वर्षांच्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराशी तुलना करण्याचे आवाहनही करेल, असे म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादीला डिवचले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT