Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Chandrakant Patil : शर्ट बदलला अन् कामाला लागलो; चंद्रकांत पाटलांनी सांगितला 'तो' प्रसंग

Chandrakant Patil News : 'कधीही बोलताना माझा उद्देश वाईट नसतो. पण...'

रूपेश बुट्टे पाटील

आंबेठाण : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. मात्र, त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागत वादावर पडदा टाकला.

तर आज यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शाईफेक झालेल्या दिवसाचा प्रसंग सांगितला आहे. ते म्हणाले, ''कधीही बोलताना माझा उद्देश वाईट नसतो. पण त्याचा गैरअर्थ काढला जातो. दोन दिवसांपूर्वी सुद्धा मी असेच बोललो असता माझ्या अंगावर शाई फेकली गेली. पण त्या बोलण्यामागे माझा हेतू चुकीचा नव्हता. त्याबद्दल मी माफी सुद्धा मागितली. पण शाईफेक सारखे गैर कृत्य केल्याने मला काही फरक पडत नाही. मी शर्ट बदलला आणि पुन्हा कामाला लागलो'', असं म्हणत त्यांनी शाईफेक प्रकरणाबाबतचा प्रसंग सांगितला.

भांबोली आणि कोरेगाव खुर्द (ता.खेड) येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आणि ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकर्त्यांच्या सन्मानप्रसंगी ते बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले,''शिवसेनेने (Shiv Sena) विश्वासघात केलानंतर झालेल्या सर्व निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. आपल्या पक्षाला महाविकास आघाडी पेक्षा अधिक यश मिळाले. जिल्ह्यात निवडणूक सुरू असलेल्या २२१ पैकी १०० ग्रामपंचायती आम्ही जिंकणार आहे. आमच्या सरकारने सुरू केलेली 'घर घर नल से पाणी' योजना तळागाळापर्यंत राबविणार आहोत'', असंही ते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, शरद बुट्टेपाटील, अतुल देशमुख, आशा बुचके, भगवान पोखरकर, कैलास गाळव, संजय रौधळ, सुनील देवकर, काळूराम पिंजण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT