Chitra Wagh, Supriya Sule sarkarnama
पुणे

BJP : सुप्रियाताई, भाजपची काळजी सोडा, बारामतीची काळजी घ्या ! ; चित्रा वाघ यांचा टोला

Chitra Wagh : ज्यांनी भाजपला वाढवलं ते खरे कार्यकर्ते आज कुठे आहेत,"असा सवाल सुळे यांनी भाजप नेत्यांना विचारला होता. त्याला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर केलेल्या टीकेला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ यांनी टि्वट करीत सुळेंवर निशाणा साधला आहे. (Chitra Wagh latest news)

सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसापूर्वी भाजपवर टीकास्त्र डागले होते. पुण्यातील उरळी देवाची येथे एका कार्यक्रमावेळी सुळे बोलत होत्या. "आधी भाजप पक्ष होता, पण आता भाजप पक्ष राहिला नसून लॉंन्ड्री झाली आहे. भाजपमध्ये जिकडे-तिकडे बाहेरील पक्षातून आलेले नेते दिसतात. ज्यांनी भाजपला वाढवलं ते खरे कार्यकर्ते आज कुठे आहेत,"असा सवाल सुळे यांनी भाजप नेत्यांना विचारला होता. त्याला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे.

चित्रा वाघ यांनी टि्वट करुन सुळेंवर निशाणा साधला आहे. "भाजपची काळजी सोडा सुप्रियाताई...२०२४ साठी आपल्या लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या,"असा टोला वाघ यांनी सुळेंना लगावला आहे.

"आता भारतीय जनता लॉन्ड्री मध्ये तो आधी भारतीय जनता पक्ष होता.त्यांच्या आणि आमच्या विचारात वैचारिक मतभेद होते.पण नात्यात कटुता कधीच नव्हती.आता लॉन्ड्री झाली आहे याचं कारण अनेक पक्षांमध्ये सगळे म्हणजे त्यांचे ओरिजिनल पेक्षा बाहेरचे गेलेले लोक जास्त दिसतात," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

"भाजप नेत्यांकडे आता बोलण्यासारखं काही उरलं नसून त्यांची दडपशाही सुरू आहे. ज्यांनी भाजपला वाढवला अगदी ज्यांनी माईक लावण्यापासून कामे केलीत ते कार्यकर्ते कुठे आहेत?, असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला. यावेळी बोलताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही टीका केल्याशिवाय दिवस जात नाही," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"कुठलंही व्यासपीठ बघा तिथे मला आनंद वाटतो की भारतीय जनता पक्षाच्या आणि लॉन्ड्रीच्या आता पक्षाच्या व्यासपीठावर आमचे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमधून गेलेले एवढे एवढे मोठे नेत्यांना एवढी संधी दिली आहे. त्याबद्दल मी भारतीय जनता लॉन्ड्रीचे आभार मानते," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT