Girish Mahajan On Ajit Pawar :  Sarkarnama
पुणे

Girish Mahajan On Ajit Pawar : '' अजित पवार आमच्यासोबत आले आणि माझं...'' ; भाजप नेते गिरीश महाजनांचं पुण्यात मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात उभी फूट पडली. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला. यात अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एकीकडे राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा रखडलेला असतानाच राष्ट्रवादीच्या शपथ घेतलेल्या नव्या मंत्र्यांना खात्यांचं वाटपही करण्यात आले.

यात विद्यमान मंत्र्यांकडील खात्यांमध्ये अदलाबदल करण्यात आले. यावरुनच भाजपसह शिंदे गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. अशातच भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारां(Ajit Pawar)समोरच आपली खंत बोलून दाखवली.

पुण्यात छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan), राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पण या कार्यक्रमात चर्चा झाली ती मंत्री गिरीश महाजनांच्या विधानाची.

महाजन म्हणाले, अजित पवार आमच्यासोबत आले आणि माझं क्रीडा खातं काढून घेण्यात आलं. आता ते का काढून घेतलं? ते मला आणि अजितदादांनाच माहिती. ते मी इथे सांगणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.

मला निश्चितच या गोष्टीचा आनंद आहे की, तीन वर्षे रखडलेला हा पुरस्कार खूप मेहनत घेऊन, आम्ही यावर खूप मेहनत घेतली. आम्ही सगळ्या तांत्रिक बाजू पडताळून बघितल्या आणि आज त्याचा शुभ मुहूर्त निघाला असल्याचेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून देत त्यांनी जगात भारताची मान उंचावली. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचाही गौरव वाढला. त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानामुळे त्यांचे नाव आजही अजरामर आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT