Jagdish Mulik, Pune BJP Latest News News
Jagdish Mulik, Pune BJP Latest News News Sarkarnama
पुणे

भाजप आक्रमक : ओबीसी मंत्र्यांनो सत्तेची लाचारी सोडा आणि राजीनामा द्या

सरकारनामा ब्यूरो

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गाला (OBC) राजकीय आरक्षण मिळावे यासाठी पुणे भाजपतर्फे (BJP) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मध्यप्रदेश सरकारने (MP Government) ओबीसी आरक्षणासाठी तयार केलेल्या प्रस्तावाची कॉपी करा, पण एकदाचे आरक्षण मिळवून द्या, अशी टीका राज्य सरकारवर (Mahavikas Aghadi) करण्यात आली. (Jagdish Mulik, Pune BJP Latest News News)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यासाठी मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातही ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपतर्फे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. 20 मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. सरचिटणीस राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर सुशिल मेंगडे, धनंजय जाधव, गायत्री खडके, आरती कोंढरे, मनिषा लडकत, प्रशांत हरसुले, प्रतीक देसरडा, दीपक माने, नंदकुमार गोसावी, राजेश धोत्रे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

मुळीक म्हणाले, राज्य सरकारने महाराष्ट्रतील ओबीसीचे राजकीय आरक्षण गमवले आहे. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड हे ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री केंद्र सरकारकडे बोट दाखवीत निमूटपणे बसून राहिले. आरक्षण गमविण्यासाठी ठाकरे सरकार जबाबदार आहे. आता तरी जागे व्हावे आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर ओबीसींचे आरक्षण मिळवून द्या, असे मुळीकांनी सुनावले.

दरम्यान, मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी, अश्या शब्दात त्यांनी महाविकास आघाडीत असलेल्या ओबीसी मंत्र्यावर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT