Nitin Gadkari  sarkarnama
पुणे

Nitin Gadkari News : 'या' नेत्यामुळेच मी पहिल्यांदा मंत्री झालो; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

Sachin Waghmare

Pune News : राज्यात 1995 साली शिवसेना-भाजपची पहिल्यांदा सत्ता आली, तेव्हा मला मंत्रीपद मिळाले. गोपीनाथ मुंडे यांनी मला मंत्रिपद दिले. मला बांधकाम खात्याचे मंत्रिपद दिले. त्यावेळी मुंबई-पुणे महामार्ग केला. त्यानंतर अनेक कामे केली. परत अटलबिहारी वाजपेयी यांनी मला बोलावले, त्याकाळी अनेक सडक योजना केल्या, असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

सकाळ माध्यम समूहा’तर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी पुण्यात पार पडला. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. (Nitin Gadkari News)

माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होते, माझी बारावीची परीक्षा. पण मी समाजकार्यात ओढले गेलो. मी परीक्षा दिली आणि मला 52 टक्के मार्क्स मिळाले. हे दुर्भाग्य आहे. मी त्यामुळे अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेत नापास झालो. आता मला आठ डिलीट मिळाल्या आहेत. त्यातील 6 कृषीसाठी मिळाले. पण अजून मी डॉक्टर लावत नाही. कारण अजून मला त्या लायकीचा मी वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

'वीज, पाणी, रस्ते, संवाद असेल त्या ठिकाणी विकास होतो. त्यामुळे पुण्याचा विकास होत आहे. हे सगळ एकत्रित एकमेकावर अवलंबून आहे. त्यामुळे उद्योग येतात राहणीमान वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या काळात ड्रोन टेक्नॉलॉजी जास्त सक्षम होणार आहे. आता 200 किलोचा ड्रोन तयार झालेला आहे. हा ड्रोन मीच लॉन्च केला आहे. मी या ड्रोन कंपनीला म्हटलं की, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मिरमध्ये जा. तिथल्या पहाडांवर जी गावं असतील तिथली सफरचंद तुम्ही या ड्रोनच्या माध्यमातून खाली आणा तसंच खालून औषधं आणि महत्वाच्या गोष्टी वरती न्या. त्यानंतर सक्सेसफुली हे तिथं सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

ड्रोन टेक्नॉलॉजी होतीय डेव्हलप

लवकरच विमानतळावरुन बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर ड्रोन उतरेल आणि डायरेक्ट भाषणला लोक येथे येतील, तो दिवस आता दूर नाही. कारण आता ड्रोन टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊन राहिली आहे. येणाऱ्या काळात टेक्नॉलॉजी खूप महत्वाचं काम बजावणार आहे, अशा शब्दांत गडकरींनी ड्रोन टेक्नॉलॉजीचं महत्व कथन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT