MLA Rohit Pawar Sarkarnama
पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान; रोहित पवारांनी घेतला समाचार

''डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आलीय...''

सरकारनामा ब्यूरो

Rohit Pawar News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत शनिवारी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्यात. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांवरील केलेल्या विधानाच्या मुद्द्यावर भाजपचे (BJP) प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) सुधांशू त्रिवेदी यांच्यावर घणाघात केला. ते म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सुधांशू त्रिवेदी हा भाजपाचा जंतू दिल्लीत वळवळला आहे. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा हा डाव तर नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललं आहे. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं 'पाणी पाजण्याची' वेळ आलीय'', अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.

''राज्यपालांनी पुन्हा त्यांची वैचारिक पातळी दाखवली. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्यामुळे आम्ही त्या व्यक्तीकडे नाही, तर त्या पदाकडे बघतो. याआधी देखील त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याबाबत टीका करत त्यांची वैचारिक पातळी दाखवून दिली होती. पण त्यांना हे धाडस कसं येतं? असं आश्चर्य व्यक्त करत पवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

भाजपचे सुधांशू त्रिवेदी नेमके काय म्हणाले?

''छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली'', असं वादग्रस्त विधान सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. हे विधान त्यांनी एका खसगी वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमात केलं होतं. दरम्यान, एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलंय. तर सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे पुन्हा नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT