Amit Shaha Sarkarnama
पुणे

Bjp Politics : विधानसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी, पुण्यातील बैठकीला अमित शाह येणार?

Bjp Meeting in Pune Amit amit shah : आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिने भाजपच्या बैठकीत मंथन होण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभेसाठीची रणनिती ठरवण्यात येणार आहे.

Roshan More

Bjp Politics : लोकसभेला मिळालेले अपयश विसरून भाजप विधानसभेच्या तयारीला लागले आहे. विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्र भाजपची पुण्यात 13 आणि 14 जुलैला बैठक होणार आहे. प्रदेश पदाधिकारी आणि विस्तार कार्यसमितीच्या या बैठकीला चार हजार पदाधिकारी उपस्थित राहणार, असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

13 जुलैला प्रदेश पदाधिकारी, 14 जुलैला विस्तारित कार्यसमिती यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी चार हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिने या भाजपच्या BJP बैठकीत मंथन होण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभेसाठीची रणनिती ठरवण्यात येणार आहे. निवडणुकीत कोणते मुद्दे केंद्रस्थानी राहावेत यासाठी पदाधिकाऱ्यांकडून देखील आढावा घेण्याची शक्यता आहे.

अजित पवार Ajit Pawar यांना महायुतीमधून बाहेर काढा, अशी मागणी शिरुरमधील एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली होती. त्या पदाधिकाऱ्यांवर अजित पवार गटाकडून जाहीर टीका देखील करण्यात आली होती. त्यामुळे अजित पवार यांचा महायुतील समावेशाबाबत विधानसभा निवडणुकीला अजित पवार गटा विषयी काय भूमिका घ्यावी, याचा देखील आढावा पदाधिकाऱ्यांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

सामूहिक नेतृत्त्व?

महाविकास आघाडी मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा समोर करणार नाही. सामूहिक नेतृत्व महाविकास आघाडी स्वीकारणार आहे. त्यामुळे महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढायची की महाविकास आघाडीप्रमाणे सामुहिक नेतृत्व स्वीकारयचे यावर खल होण्याची शक्यता बैठकीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT